सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:58+5:302021-06-02T04:09:58+5:30

परिषद आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी ...

Break due to super spreader survey | सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे ब्रेक

सुपर स्प्रेडर सर्वेक्षणामुळे ब्रेक

Next

परिषद आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, व्यापारी म्हणजे ज्या व्यक्‍तींचा अनेक व्यक्‍तींबरोबर संपर्क येतो, अशी व्यक्‍ती ही सुपर स्प्रेडर ठरते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची भीती अधिक आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने या सुपर स्प्रेडर सर्वेक्षणाला सुरुवात झाली. २१ ते २८ एप्रिलदरम्यान ग्रामीण भागात जवळपास १७ हजार १०० व्यक्‍तींची तपासणी केली. त्यामध्ये संशयित म्हणून ६ हजार १०२ जणांची नमुने तपासणी केली असता १ हजार ५८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तपासणी संख्येच्या तुलनेत बाधित संख्येचे प्रमाण कमी असले तरी, हे व्यक्‍ती संसर्गवाढीला जबाबदार ठरू शकतात. तर १२ ते २६ मे दरम्यान, २७ हजार ६६३ सुपर स्प्रेडर सर्वेक्षणातून ५६९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Web Title: Break due to super spreader survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.