ब्रेकफेल झालेल्या पीएमपीची वाहनांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 08:22 PM2019-03-07T20:22:09+5:302019-03-07T20:23:18+5:30
काेथरुड डेपाे येथील आनंदनगर चाैकात एका पीएमपीने सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने नागरिक जखमी झाले.
पुणे : काेथरुड डेपाे येथील आनंदनगर चाैकात एका पीएमपीने सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने नागरिक जखमी झाले. दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली असून पीएमपीचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी दाेनच्या सुमारास काेथरुड येथील आनंदनगर चाैकात पीएमपीच्या बसने सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. यात चारजण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दाेन जणांना उपचारानंतर घरी साेडण्यात आले असून दाेघांवर उपचार सुरु आहेत. वर्तुळमार्गाची ही बस असून बसमध्ये तांत्रिक अडचणीमुळे ब्रेकफेल झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दाेनच दिवसांपूर्वी पीएमपी बसला मध्यरात्री आग लागली हाेती. त्याचबराेबर पीएमपीच्या ब्रेकफेल हाेण्याच्या घटना ही गेल्या काही काळात घडल्या आहेत. त्यामुळे पीएमपीच्या देखभाल दुरुस्ती याेग्य प्रकारे केली जाते की नाही असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान ब्रेकफेल कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट हाेऊ शकले नाही.