बसच्या ब्रेकडाऊनला लागेना ‘ब्रेक’, भाडेतत्त्वावरील बसचे प्रमाण तुलनेने अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:02 AM2018-03-13T01:02:57+5:302018-03-13T01:02:57+5:30

बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) फारसे यश मिळालेले नाही. मागील चार महिन्यांत बसच्या ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावता आलेला नाही.

The breakdown of the bus breakdown is relatively high, compared to the proportion of rental buses | बसच्या ब्रेकडाऊनला लागेना ‘ब्रेक’, भाडेतत्त्वावरील बसचे प्रमाण तुलनेने अधिक

बसच्या ब्रेकडाऊनला लागेना ‘ब्रेक’, भाडेतत्त्वावरील बसचे प्रमाण तुलनेने अधिक

Next

पुणे : बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) फारसे यश मिळालेले नाही. मागील चार महिन्यांत बसच्या ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावता आलेला नाही. दररोज सरासरी दीडशेहून अधिक बस मार्गावरच बंद पडत आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.
मार्गावरच रुसणाºया बस ही पीएमपीची नेहमीच डोकेदुखी राहिली आहे. त्यावरून पीएमपी बसच्या क्षमतेवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले. बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दिवसाबरोबरच रात्रीही सुरू केले. रात्रीच्या वेळी ही कामे होऊ लागल्याने दुसºया दिवशी मार्गावरील बसची संख्या वाढली. भाडेतत्त्वावरील पीपीपीमधील बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना मोठा दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्गावर बंद पडणाºया बसची संख्या कमी करण्यात काहीसे यश मिळाले.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात एकूण १९७२ बस असून त्यामध्ये ६५३ बस भाडेतत्त्वावरील आहेत. मुंढे यांनी पदभार स्वीकारला त्या वेळी दररोज २५० ते ३०० बस मार्गावर बंद पडत होत्या. त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे नोव्हेंबरपर्यंत हा आकडा १५० पर्यंत खाली आला. मुंढे यांनी नोव्हेंबर महिन्यात पीपीपी तत्त्वावरील करार रद्द करून त्यांच्याकडील २०० बस ताफ्यात घेतल्या. नोव्हेंबरनंतर ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे प्रमाण १५० ते १६० दरम्यान स्थिर राहिले.
>शेकडो फेºया ऐनवेळी कराव्या लागतात रद्द
पीएमपीच्या मालकीच्या बसच्या तुलनेत भाडेतत्त्वावरील बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. तसेच त्याला ब्रेक लावण्यात पीएमपी प्रशासनाला तितकेसे यश मिळालेले नाही.
भाडेतत्त्वावरील बस निम्म्याने कमी असूनही बे्रकडाऊनचे प्रमाण मात्र अधिक असल्याने शेकडो फेºया अचानक रद्द कराव्या लागत आहेत.
पीएमपीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार सोमवारी एकूण १७०८ बसच्या २१ हजार ५१४ फेºयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १२५७ बस मार्गावर आल्या. त्यामुळे जवळपास पाच हजार फेºया रद्द कराव्या लागल्या.
>‘पीएमपी’ बसचे ब्रेकडाऊन
महिना एकूण ब्रेकडाऊन पीएमपी मालकीच्या पीपीपी भाडेतत्त्वावरील
सप्टेंबर ६११० (२०४) २५६० (८५) ४९० ३०६० (१०२)
आॅक्टोबर ६१९९ (२००) २५८९ (८३) ५४१ ३०७९ (९९)
नोव्हेंबर ४७४७ (१५८) १५४० (५१) २८४ २९२३ (९७)
डिसेंबर ५१२९ (१६५) २२८६ (७४) - २८४३ (९२)
जानेवारी ४७९६ (१५४) २१७३ (७०) - २६२३ (८५)
फेब्रुवारी ४५६० (१६२) २०६५ (७३) - २४९५ (८९)
४ मार्चपर्यंत ६०८ (१५२) २७१ (६८) - ३३७ (८४)

Web Title: The breakdown of the bus breakdown is relatively high, compared to the proportion of rental buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.