जमावबंदीचा भंग; २० जणांवर गुन्हा
By admin | Published: October 14, 2016 05:29 AM2016-10-14T05:29:43+5:302016-10-14T05:29:43+5:30
वरवंड येथे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा पुतळा जाळून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दौंड तालुका महिला राष्ट्रवादीच्या
यवत : वरवंड येथे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा पुतळा जाळून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दौंड तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांच्यासह २० जणांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महादेव जानकर यांनी भगवानगड येथे दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाचा निषेध म्हणून दौंड तालुक्यातील वरवंड येथे काल (दि.१२) रोजी सकाळी मंत्री महादेव जानकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून घोषणा दिल्या गेल्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दौंड तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांच्यासह डॉ. विजय दिवेकर,संदीप किसन दिवेकर, गणपत दिवेकर, संदीप सीताराम दिवेकर, मोतीलाल शिवाजी दिवेकर, अक्षय बाळासाहेब जगताप, विशाल दीपक दिवेकर, राहुल रामदास दिवेकर, राजू बारवकर, हनुमंत दिवेकर, सिद्धार्थ रणधीर, सुनील फरगडे, दशरथ दिवेकर, योगेश खराडे, नीलेश दशरथ दिवेकर, गणेश केशव दिवेकर, वैभव मनोहर दिवेकर, दिलीप विठ्ठल दिवेकर, बबन खुटवड अशा २० जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(वार्ताहर)