तोडपाणी करणा:यांचा निषेध

By admin | Published: December 9, 2014 12:19 AM2014-12-09T00:19:22+5:302014-12-09T00:19:22+5:30

मनासारखी डय़ुटी लावण्यासाठी तोडपाणी करणारे अधिकारी व कर्मचारी पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सेवेमध्ये नाहीत.

Breakdown: The prohibition | तोडपाणी करणा:यांचा निषेध

तोडपाणी करणा:यांचा निषेध

Next
पुणो : मनासारखी डय़ुटी लावण्यासाठी तोडपाणी करणारे अधिकारी व कर्मचारी पुणो महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सेवेमध्ये नाहीत. मात्र, तरीही एखादा कर्मचारी किंवा अधिकारी नकळतपणो असे करीत असेल तर त्याचा संघटना निषेध करीत आहे, असे पीएमपी ‘इंटक’चे उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी सांगितले.
‘लोकमत’ने रविवारी पीएमपीत डय़ुटी लावण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा प्रकार समोर आणला होता. ‘पीएमपीत डय़ुटी लावण्यासाठीही तोडपाणी’ या मथळ्य़ाखाली हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत पीएमपी कामगारांची प्रमुख संघटना असलेल्या पीएमपी ‘इंटक’ने असे अधिकारी व कर्मचा:यांचा निषेध केला आहे. आर्थिक तोटय़ात असलेल्या पीएमपीला कर्मचा:यांच्या सहकार्यामुळेच आधार मिळत आहे. त्यामुळे कर्मचारी असे प्रकार करणार नाहीत. संघटनेच्या नकळत असे काही घडत असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचा:यांना संघटना पाठिशी घालणार नाही. त्यांचा संघटनेतर्फे निषेध केला जात आहे. (प्रतिनिधी)
 
आर्थिक देवाण-घेवाण करून डय़ुटी लावण्याचे प्रकार होत असेल तर ते चुकीचे आहे. मात्र आतार्पयतएकदाही असा प्रकार घडल्याचे  संघटनेच्या निदर्शनास आलेले नाही. असे अधिकारी व कर्मचारी पीएमपीच्या सेवेत नाहीत. पीएमपी कामगारांच्या भरवशावरच उभी असून प्रवाशांना सेवा देत आहे.
अशोक जगताप, उपाध्यक्ष, इंटक
 

 

Web Title: Breakdown: The prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.