Breaking : पुण्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 06:42 AM2019-06-29T06:42:25+5:302019-06-29T07:44:20+5:30
पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये इमारतीची संरक्षक भिंत कच्च्या झोपड्यांवर कोसळून दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे - मुसळधार पावसादरम्यान पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. कोंढवा परिसरामध्ये इमारतीची संरक्षक भिंत कच्च्या झोपड्यांवर कोसळून दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.
कोंढवा परिसरात बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळली. या परिसरात सुरू असलेले खोदकाम आणि मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून 3 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
Pune: 12 have died and 2 are injured after a wall collapsed in Kondhwa. Rescue operations are underway. #Maharashtrapic.twitter.com/J8K3BO3fLm
— ANI (@ANI) June 29, 2019