Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:03 PM2020-07-16T12:03:28+5:302020-07-16T12:35:49+5:30

तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के इतका लागला आहे. 

Breaking: Maharashtra Board announces 12th result; The overall result of the state is 90.66 percent | Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

Next

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल  ९०.६६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.
राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख  ८१ हजार ७१२  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.
कोरोनामुळे इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होता. मात्र, विद्यार्थी व पालकांची निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर सर्व अडचणींवर मात करून गुरुवारी राज्य मंडळाने निकाल जाहीर केला.
------------
 विभागीय मंडळ निहाय निकाल

 पुणे  :९२. ५० टक्के

नागपूर : ९१.६५  टक्के

औरंगाबाद :८८ .१८ टक्के

 मुंबई  :८९ .३५ टक्के

कोल्हापूर  :९२ .४२ टक्के

 अमरावती  :९२.०९  टक्के 

 नाशिक :८८ .८७ टक्के

लातूर  : ८९. ७९ टक्के

कोकण : ९५ . ८९ टक्के
-----------------
शाखानिहाय निकाल
 कला - ८२.६३
 वाणिज्य - ९१.२७
 विज्ञान - ९६.९३
व्यवसायिक अभ्यासक्रम- ८६.०७


 या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल
१) www.mahresult.nic.in
२)www.hscresult.mkcl.org
३)www.maharashtraeducation.com
--------
राज्य मंडळातर्फे सकाळी ११ वाजता निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र,पुण्यात लॉकडाऊन असल्यामुळे राज्य मंडळाच्या काही कर्मचाऱ्यांना  पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. परिणामी मंडळातील कर्मचार्‍यांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे सकाळी ११ ऐवजी बारावीचा निकाल ११.४५ वाजता जाहीर झाला, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Breaking: Maharashtra Board announces 12th result; The overall result of the state is 90.66 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.