प्रेमभंग : पंधरा पानांची सुसाईड नोट लिहून तरुणाने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 11:13 PM2018-06-29T23:13:44+5:302018-06-29T23:15:49+5:30

प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून एका उच्च शिक्षीत तरुणाने तब्बल पंधरा पानांची सोसाईट नोट लिहून राहत्या खोलीत गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

breakup : Written by a fifteen-pages suicide note, the youth Committed suicide | प्रेमभंग : पंधरा पानांची सुसाईड नोट लिहून तरुणाने घेतला गळफास

प्रेमभंग : पंधरा पानांची सुसाईड नोट लिहून तरुणाने घेतला गळफास

googlenewsNext

 पुणे  - प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून एका उच्च शिक्षीत तरुणाने तब्बल पंधरा पानांची सोसाईट नोट लिहून राहत्या खोलीत गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसरमधील अ‍ॅमनोरा पार्क येथे ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. 

 अक्षय अखिलेशवर कुमार (वय २२, रा. टॉवर न.२५ अ‍ॅमनोरा पार्क, मूळ रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अक्षयने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये  त्याच्या प्रेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सर्व माहिती दिली आहे. मी मुलगा होण्याचे कर्तव्य निभावू शकलो नाही, असे म्हणत त्याने आई, वडील व भावाची माफी देखील मागितलेली आहे. तसेच मित्रांना उद्देशूनही माफी मागितलेली आहे. दरम्यान प्रेमाचे ब्रेकअप का झाले, हे या सुसाईड नोटमध्ये लिहीले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

 याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आयबीएस कॉलेजमधील व्यवस्थापन शास्त्राचे (मॅनेजमेंट) शिक्षण घेत होता. तो  एका खोलीत एकटाच भाड्याने राहत. अक्षयचे त्याच्याच महाविद्यावलयातील एका मुलीसोबत एका वर्र्षांपासून प्रेम संबंध सुरू होते. परंतु, काही महिन्यांपुर्वी त्यांचे काही कारणांवरून ब्रेकअप झाले होते. त्यामुळे तो नैराश्यात होता. तिली भेटण्यास बोलविल्यानंतरही ती अक्षयला भेटायला येत नव्हती. त्यामुळे तो गेल्या एक महिन्यांपासून कॉलेजलाही जात नसे. गुरुवारी देखील तो कॉलेजला गेला नाही. त्यामुळे मित्र गुरुवारी दिवसभर त्याला फोन करत होते. मात्र, तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे मित्र सायंकाळी पाचच्या सुमारास त्याच्या रूमवर गेले. दरवाजा न उघडल्याने मित्र खिडकीतून डोकावले. त्यावेळी त्याने रूममधील फॅनला दोरूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. मित्रांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: breakup : Written by a fifteen-pages suicide note, the youth Committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.