यवतच्या ओढ्याचा श्वास कोंडलेलाच

By admin | Published: July 9, 2015 11:22 PM2015-07-09T23:22:20+5:302015-07-09T23:22:20+5:30

महामार्गाच्या पुलाखालील राडारोडा काढण्याचे काम परत एकदा थांबल्याने पालखी मुक्काम असणाऱ्या श्री काळभैरवनाथ मंदिराजवळच सांडपाण्याचा बंधारा तयार झाला आहे.

The breath of the flow of yawat | यवतच्या ओढ्याचा श्वास कोंडलेलाच

यवतच्या ओढ्याचा श्वास कोंडलेलाच

Next

यवत : येथील ओढ्याचा श्वास अद्यापही कोंडलेलाच आहे. महामार्गाच्या पुलाखालील राडारोडा काढण्याचे काम परत एकदा थांबल्याने पालखी मुक्काम असणाऱ्या श्री काळभैरवनाथ मंदिराजवळच सांडपाण्याचा बंधारा तयार झाला आहे.
सांडपाणी मोठ्या प्रमाणावर साठून राहिले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवार दि.१३ जुलै रोजी यवत मुक्कामी येणार आहे. पालखी सोहळा मुकामी येत असल्याने गावातील पूर्व तयारीचे काम जोरात सुरु आहे.
मात्र, पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना ओढ्यावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या खालील राडारोडा तसाच पडून राहिल्याने मागील पावसाळ्यात पुराला तोंड देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. महामार्गाच्या बाजुला असलेली अनेक दुकाने व घरे तसेच आनंदग्राम सोसायटी मध्येदेखील पाणी घुसले होते. यात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आमदार राहुल कुल यांनी महामार्ग प्राधिकरणाचे पंदारकर यांच्याकडे याची तक्रार करुन ओढ्यातील राडा रोडा साफ करण्याची मागणी केली होती. मागील वर्षभरात चार ते पाच वेळा ओढा साफ करण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले. मात्र काम अर्धवट स्थितीत बंद केले. पालखी सोहळा मुक्कामी येण्याच्या अगोदर काही दिवस काम परत सुरु करण्यात आले होते.
पोकलेन मशीनच्या साह्याने काम सुरु झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, गावातील विघ्नसंतोषी पुढाऱ्याने काम करणाऱ्या ठेकेदाराला दमबाजी करुन काम बंद पाडले. ठेकेदाराला मारण्यासाठी तेथे काही जण गेल्याने काम बंद झाल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाचे पंदारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)

ग्रामपंचायतीबरोबरच महसूल विभागाचे दुर्लक्ष
प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी यवतमधील ओढ्याची पाहणी केली होती. त्यानंतर ओढ्यातील मोजणी करुण ओढ्याचे पात्र रुंद करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याचे नंतर काय झाले याची माहिती मिळाली नाही. ग्रामपंचायतीने अतिक्रमणांकड़े दुर्लक्ष केले आहे. ओढ्याचे पात्र अरुंद झाल्याने भविष्यात वारंवार पुराने नुकसानीची शक्यता आहे.

Web Title: The breath of the flow of yawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.