सहकाऱ्याकडून पे फोनद्वारे स्वीकारली लाच, ड्युटी अंमलदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:40+5:302021-06-29T04:09:40+5:30

प्रमोद विक्रम कोकाटे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्याचे काम ड्युटी अंमलदाराकडे असते. आपल्याला ...

Bribe accepted by pay by colleague, suspended duty officer | सहकाऱ्याकडून पे फोनद्वारे स्वीकारली लाच, ड्युटी अंमलदार निलंबित

सहकाऱ्याकडून पे फोनद्वारे स्वीकारली लाच, ड्युटी अंमलदार निलंबित

Next

प्रमोद विक्रम कोकाटे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्याचे काम ड्युटी अंमलदाराकडे असते. आपल्याला सोयीची ड्युटी लावावी, यासाठी अनेकांना जण ड्युटी अंमलदाराची मर्जी संभाळण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे लाच द्यावी लागते, हा पोलिसांमधील नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. वारजे माळवाडी येथील ड्युटी अंमलदार प्रमोद कोकाटे हा एका पोलीस शिपायाला जाणूनबुजून त्रास देऊन सतत लाचेची मागणी करीत होता. त्यांना काम शिकायचे असल्यामुळे त्यांनी मजबुरीतून २६ नोव्हेंबर २०१९ व १४ जानेवारी २०२० रोजी फोन पेद्वारे प्रमोद कोकाटे याला लाच दिली. पोलीस शिपायाने केलेल्या तक्रार अर्जासोबत फोन पेचे स्क्रिन शॉटही जोडले होते. सहायक पोलीस आयुक्तांमार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात कोकाटे याने आपण पैसे उसने दिले होते, ते त्यांनी फोन पेद्वारे पाठविल्याचे सांगितले. मात्र, कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे कोकाटे याने लाच स्वीकारली, असे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रमोद कोकाटे याला निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Bribe accepted by pay by colleague, suspended duty officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.