लाच घेणा:या लिपिकासह दोघांना 3 वर्षाची शिक्षा
By admin | Published: October 29, 2014 10:53 PM2014-10-29T22:53:57+5:302014-10-29T22:53:57+5:30
आळंदी नगरपालिकेच्या लिपिकासह त्याच्या साथीदाराला विशेष न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी 3 वर्षे साधी कैद व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Next
पुणो : औषधे फवारणीचे बिल काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या आळंदी नगरपालिकेच्या लिपिकासह त्याच्या साथीदाराला विशेष न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी 3 वर्षे साधी कैद व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
लिपीक मनोज फत्तेसिंग राठोड व त्याचा साथीदार शशिकांत मारूती चव्हाण अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. कलम 13 (1) (ड) सह 13 (2) अन्वये दोघांना शिक्षा सुनावण्यात आली.
आळंदी नगरपालिकेमध्ये लिपीक म्हणून काम करीत असताना राठोड याने औषध फवारणीचे बिल काढण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच मागितली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर राठोड व त्याच्या साथीदाराला सापळा रचून रंगेहाथ पकडले होते.
शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयामध्ये हा खटला सुरू होता, दरम्यानच्या काळात खेड येथे सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर तिकडे हा खटला वर्ग करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संगीता राठोड यांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील प्रताप जाधव यांनी दोघांना शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी युक्तिवाद केला. याप्रकरणी दोघांविरूध्द सबळ पुरावे आढळून आल्याने त्यांना 3 वर्षे साधी कैद व 1 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. (प्रतिनिधी)