Bribe Case : इंदापूरच्या पोलिसाने वर्षात कमावले दोन कोटी सात लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 09:25 AM2024-11-22T09:25:30+5:302024-11-22T09:25:30+5:30

धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे

Bribe CaseIndapur police officer earned Rs 2.7 crore in a year, Anti-Corruption Bureau uncovers the case | Bribe Case : इंदापूरच्या पोलिसाने वर्षात कमावले दोन कोटी सात लाख

Bribe Case : इंदापूरच्या पोलिसाने वर्षात कमावले दोन कोटी सात लाख

पुणे : रेडणी (ता. इंदापूर) येथे राहणाऱ्या एका पोलिस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमावल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. संबंधित निरीक्षकावर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हरिभाऊ नारायण खाडे (तत्कालीन पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड, रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध १६ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.

चौकशीदरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४ या दरम्यान हरिभाऊ खाडे याने त्यांच्या सेवा कालावधीतील परीक्षण काळात सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७ लाख ३१ हजार ३५८ रुपये (११६.२८ टक्के) रकमेची अपसंपदा जमा केली आहे. त्यापैकी त्याची पत्नी मनीषा खाडे हिने सुमारे ६२ लाख ७९ हजार ९५३ रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर धारण करून हरिभाऊ खाडे याला अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे उघड झाले.

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी केली आहे. पोलिस निरीक्षक किरण बगाटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Bribe CaseIndapur police officer earned Rs 2.7 crore in a year, Anti-Corruption Bureau uncovers the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.