लाचखोरीची प्रकरणे :चाकण रुग्णालयात गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:38 AM2018-11-06T00:38:49+5:302018-11-06T00:39:03+5:30

 प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या सेवा मिळतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या येथील रुग्णांना मात्र वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात राजरोसपणे सुरू आहे.

Bribery cases: Inconvenience to Chakan hospital | लाचखोरीची प्रकरणे :चाकण रुग्णालयात गैरसोय

लाचखोरीची प्रकरणे :चाकण रुग्णालयात गैरसोय

googlenewsNext

आंबेठाण -  प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात झाल्यानंतर रुग्णांना चांगल्या सेवा मिळतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या येथील रुग्णांना मात्र वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात राजरोसपणे सुरू आहे. पैशांची मागणी करत भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडालेल्या येथील डॉक्टरांच्या भ्रष्ट कारभाराला येथील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. विशेष बाब म्हणजे चाकण ग्रामीण रुग्णालयात एका डॉक्टर महाभागाने चक्क अवघडलेल्या अवस्थेत असलेल्या एका गर्भवती महिलेकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा विचित्र प्रकार चव्हाट्यावर आला असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
चाकण येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या मृत नातेवाईकांच्या कडून विच्छेदनासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी ताज्या असतानाच गेल्या काही दिवसांपासून गर्भवती महिलांकडे पैशांची मागणी केल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. याबबत नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या भागात असलेली एका अत्यंत गरीब कुटुंबातील एक अवघडलेल्या अवस्थेतील एक गर्भवती महिला या रुग्णालयात गेल्या नंतर सबंधित महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी येथील एका खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आल्याचे तीच्या नातेवाईकांनी सांगितले. सबंधित गर्भवती महिलेची प्रकुती अत्यंत धोकादायक व चिंताजनक असल्याचे माहिती असतानाही देखील जाणूनबुजून तिला त्रास देण्याचा प्रकार घडला. मात्र, गर्भपात करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिका?्याने सबंधित महिलेकडे चक्क पाच हजार रुपये मागितले. माझी पैसे देण्याची ऐपत नाही, माझी परिस्थिती खूप हलाखीची आहे, तरी मला सहकार्य करा, अशी आर्त विनवणी तीने सबंधित डॉकटकडे केली असता त्याने तिला उलट प्रश्न करून दवाखान्यात येत कशाला,? असा अजब सल्ला दिला. गर्भवती महिलेची तपासणी व तिच्यावर कसलेच उपचार न करता तिला हाकलून देण्यात आल्याने तिच्या नातेवाईकांनी माहिती दिली आहे.संबधित डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे,नगरसेविका अश्विता लांडे-कु?्हाडे, कमरुद्दीन शेख,हनुमंत कु?्हाडे, व्यंकटेश सोरटे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

डॉक्टरांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
सबंधित गर्भवती महिला व तीच्या नातेवाईकांच्या आलेल्या तक्रारी नुसार सबंधित डॉकटरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर सबंधित डॉकटरकडून नेमके काय उत्तर येते, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबत कसलीच टाळाटाळ न करता व कोणाला पाठीशी न घालता कायदेशीर व योग्य ती कारवाई केली जाणार आहे. - डॉ. माधव कणकवले, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाकण.
आर्थिक तरतुदीनुसार योग्य उपाययोजना करा -
चाकण प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर चांगल्या सेवा मिळण्याची नितांत गरज आहे. मात्र तसे न होता रुग्णांची हेळसांड वाढली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. त्यासाठी सर्वांच्या भावनांची कदर करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ आर्थिक तरतुदीनुसार योग्य उपाययोजना कराव्यात.
- अश्विता लांडे-कुºहाडे, ( उपसभापती, महिला बाल कल्याण)

Web Title: Bribery cases: Inconvenience to Chakan hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.