लाचखोर अधिष्ठाता डॉ. आशिष बनगिनवारची अखेर हकालपट्टी; प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 01:39 PM2023-09-07T13:39:31+5:302023-09-07T13:41:11+5:30

आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, तसा आदेशही आयुक्तांनी दिला....

Bribery founder Dr. Ashish Banginwar finally sacked; A bribe of Rs 10 lakh for entry | लाचखोर अधिष्ठाता डॉ. आशिष बनगिनवारची अखेर हकालपट्टी; प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच

लाचखोर अधिष्ठाता डॉ. आशिष बनगिनवारची अखेर हकालपट्टी; प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार याला अखेर महापालिका सेवेतून काढून टाकण्यात आले. आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, तसा आदेशही आयुक्तांनी दिला.

वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी बनगिनवार याने १६ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील १० लाख रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. महापालिकेच्या मालकीचे एखादे वैद्यकीय महाविद्यालय असावे, त्यात गरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने महापालिकेने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. त्याच्या अधिष्ठातापदी बनगिनवार याची निवड महापालिकेनेच केली होती.

महाविद्यालय संचलित करण्यासाठी शिक्षण ट्रस्ट स्थापन केला आहे. त्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व पक्षांचे नेते, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागप्रमुख, महाविद्यालयाचा अधिष्ठाता, शहर अभियंता, विधि सल्लागार यांचा समावेश आहे. मागील सव्वा वर्ष महापालिकेचे सभागृहच अस्तित्वात नाही. त्यामुळे या ट्रस्टवर सध्या केवळ प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळेच महाविद्यालयात बरेच गैरप्रकार सुरू असल्याचे बोलले जात होते.

लाच प्रकरणाने त्याला पुष्टीच मिळाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने त्याला सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Bribery founder Dr. Ashish Banginwar finally sacked; A bribe of Rs 10 lakh for entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.