वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 06:40 PM2019-10-30T18:40:39+5:302019-10-30T18:42:45+5:30
वाघाेलीत रस्त्याच्याकडेला एका राॅडला गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे.
वाघोली : पुणे - अहमदनगर महामार्गाजवळ वाघाेलीमध्ये रस्त्याच्या कडेला एका लाेखांडी राॅडला महिलेचा मृतदेह लटकत असल्याचे दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अहमदनगर येथील नागापूर येथील विवाहीत महिलेने वाघाेली येथे येऊन गळफास घेत आत्महत्या केली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी गणेश तांबे ( वय 28, रा. नागापूर, जिल्हा - नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ती आपल्या आईसोबत सोमवारी रात्री नागापूरहून पुण्याकडे निघाली हाेती. वाघोली येथे उतरल्यानंतर तिने आईला सोडून पळ काढला. आईने तिचा शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने तीची आई परत नगरला गेली. दरम्यान अश्विनी हिने वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील लोखंडी रॉड ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या वॉर्डनला सांगितले. त्याने पोलीस ठाण्यात ही घटना कळविली. तिच्याकडे एक पर्स आढळून आली. त्यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, डेबिट कार्ड व मोबाईल नंबर आढळून आले.परंतु आत्महत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
लोणिकंद पोलिसानी तिच्याजवळ सापडलेल्या नंबरवर संपर्क साधून कुंटूबियांना माहिती कळविली. नागापूरहून नातेवाईक आल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला हलविण्यात आला. तिचे माहेर बीड जिल्ह्यातील शिरपूर येथील असून पती गणेश हे मुंबईला खाजगी कंपनीत नोकरी करता . या तरुणीने एवढ्या लांब येऊन आत्महत्या का केली ? यांचे गुढ मात्र कायम आहे.