लेण्याद्री-जुन्नर रस्त्यावरील पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:27+5:302021-06-24T04:09:27+5:30

पुलावरील मातीचा भराव निघून गेल्याचे ठिकाणी पुलाचा स्लॅब अधांतरी तरंगत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी संरक्षक कठड्यांना ...

The bridge on the Lenyadri-Junnar road is dangerous | लेण्याद्री-जुन्नर रस्त्यावरील पूल धोकादायक

लेण्याद्री-जुन्नर रस्त्यावरील पूल धोकादायक

Next

पुलावरील मातीचा भराव निघून गेल्याचे ठिकाणी पुलाचा स्लॅब अधांतरी तरंगत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी संरक्षक कठड्यांना वाहनाच्या धडका बसल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे.

अष्टविनायकातील एक लेण्याद्री पर्यटनस्थळ याच मार्गावर आहे. जुन्नर-मुंबई वाहतुकदेखील याच मार्गावरून होते. जुन्नर परिसरात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मुंबई शेतमाल मार्केटमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेण्यात याच मार्गाचा वापर होतो.

आता थोड्या प्रमाणात रस्त्याचा भराव खचला, तरी पावसाळ्यात वाहत्या पाण्यामुळे मातीची मोठ्या प्रमाणात धुप होते.

भरावाची माती निघून गेल्यामुळे भविष्यात पुलाला धोका निर्माण होणे, रस्त्यावरी वाहतूक खंडित होणे, वाहन अपघात होणे इत्यादी संकटासामोरे जावे लागणार आहे. प्राथमिक अवस्थेत असतानाच रस्त्याच्या भरावाची डागडुजी करणे अत्यावश्यक आहे.

--

फोटो क्रमांक : २३जुन्नर पूल धोकादायक

फोटो ओळ : कुकडी नदीवर पिंपळगाव सिद्धनाथकडील बाजुच्या पुलाला जोडणारा भराव खचल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: The bridge on the Lenyadri-Junnar road is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.