वेलवळी गावालसा जोडणाऱ्या एकमेव रस्त्यावरील पुलाचा भराव गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:56+5:302021-08-01T04:09:56+5:30
भोरगीरी परिसरातील डोंगरावर असलेलं वेलवळी गाव भीमानदीच्या पलीकडे असल्याने या गावात विकासाचा मागमूसही नाही. विज नाही, पाण्याची सोय नाही ...
भोरगीरी परिसरातील डोंगरावर असलेलं वेलवळी गाव भीमानदीच्या पलीकडे असल्याने या गावात विकासाचा मागमूसही नाही. विज नाही, पाण्याची सोय नाही , शाळा नाही, आरोग्य केंद्राचा कुणी कर्मचारी फिरकत नाही. अशापरिस्थित गावकरी दळणवळणासाठी या एकमेव रस्त्यावर अवलंबून असतात विशेष म्हणजे हा रस्ता पायथ्याशी संपतो. तेथून पुढे एक तास पायपीट करत डोंगर चढुन गावात पोहचता येते. अतिवृष्टीमुळे चिखल व पुर यामुळे हि आदिवासी वस्ती संकटात सापडली असल्याने तातडीने मदत व्हावी यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांनी केली आहे.
या पुलाच्या भरावाचे काम तातडीने न झाल्यास ऐन पावसाळ्यात अन्नधान्या बरोबर आरोग्याच्या मोठा प्रश्न वेलवळीकरांपुढे आहे. आरोग्य केंद्र डेहणे येथे पंधरा किलोमीटर वर असल्याने वृद्ध रुग्ण, लहान मुले गर्भवती महिला यांच्यावर उपचार कसे होणार याची भिती ग्रामस्थ यमन डोळस, धोंडु बानेरे यांनी लोकमत जवळ व्यक्त केली.
310721\img-20210722-wa0024.jpg
फोटो :-
वेलवळी (ता .खेड) येथील भिमानदी ला जोडणा-या रस्तावरचा पुलाचा भराव वाहुन गेला आहे.