मळद येथे कॅनॉलवरील पूल खचला , ग्रामस्थांची गैरसोय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:54 AM2018-01-02T01:54:06+5:302018-01-02T01:54:19+5:30

मळद (ता. दौंड)येथे गावाला जोडणाºया खडकवासला कॅनालवरील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, मळद गावाला जोडणारा हा पुल मुख्य मार्ग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.

 The bridges of canals at the molasses collapsed, the disadvantage of the villagers | मळद येथे कॅनॉलवरील पूल खचला , ग्रामस्थांची गैरसोय  

मळद येथे कॅनॉलवरील पूल खचला , ग्रामस्थांची गैरसोय  

googlenewsNext

कुरकुंभ : मळद (ता. दौंड)येथे गावाला जोडणाºया खडकवासला कॅनालवरील पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, मळद गावाला जोडणारा हा पुल मुख्य मार्ग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. वाहतूक बंद असतांनाही येथूनही दुचाकीस्वार या मार्गाने जात आहे. तर मोटार चालक मळद येथील रेल्वेच्या जुन्या नँरोगेज मार्गावरून धोकादायक पद्धतीने वापर करत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याआधी मुख्य पुलाची पुर्नबांधणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गा लगत असणाºया मळद गावातून खडकवासला कॅनॉलची बांधणी १९८३ च्या सुमारास करण्यात आली होती. त्याच दरम्यान मळद गावाला रहदारीसाठी या कॅनॉलवरून पुलाची बांधणी करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलावरून आजपर्यंत वाहतूक सुरु आहे. या दरम्यान मळद गावाची वाढलेली लोकसंख्या व रहदारीची बदललेली साधने यामुळे दिवसेंदिवस या पुलाची अवस्था खराब झाली आहे. मात्र पुलाच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.
मळद या गावाच्या सभोतालच्या परिसरातून हा कँनाल गेला आहे. यामुळे येथे जाणारा प्रत्येक नागरिक हा या कँनाल वरूनच जातो. या ठिकाणी जवळपास चार जागेवरती पुल बांधण्यात आले आहेत. त्यापैकी मळद गावाठानाला जोडणारा मुख्य पुल, प्राथमिक शाळेला जोडणारा दुसरा पादचारी पुल व रणवरे वस्तीला जोडणारा पुल असे तीन पुल बांधण्यात आले आहेत. हे पुल सिमेंटचे आहेत. चौथा पुल हा भंडलकर वस्ती येथे असून तो लोखंडी आहे. या चारही पुलांची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. यामुळे या पुलांची बांधणी करणे गरजेचे आहे. मळद ग्रामपंचायतने २०१५ साली खडकवासला शाखा रावणगाव उपभियांता दौंड यांना लेखी पत्राद्वारे दिलेली होती. मात्र, याबाबत कुणीच दखल घेतली गेलेली नाही. प्राथमिक शाळेजवळ असणा-या पुलावरून रोज शालेय मुलांची व परिसरातल्या नागरिकांची वर्दळ असते. पर्यायी मार्ग नसल्याने जीव मुठीत धरूनच त्यांना प्रवास करावा लागतो.
भंडलकर वस्ती वरील लोखंडी पुलाची देखील अवस्था अत्यंत बिकट आहे. मात्र काहीच पर्याय नसल्याने नागरिक याचा उपयोग करतात. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार खडकवासला कँनालचे अधिकारीच असतील यात शंका नाही त्यामुळे याची वेळीच गंभीर दखल घेवून नव्याने पुल बांधने आवश्यक आहे.

मळदला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची अतिशय गैरसोय होत आहे त्यातही पयार्यी मार्ग अतिशय अरुंद व कठडे नसल्याने तो अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे नवीन पुलाची बांधणी लवकरात लवकर करून मिळावी तसेच गावातील प्रत्येक पुल दुरुस्ती किंवा नव्याने बांधून दिला जावा यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे.
- महेश रणवरे, सरपंच मळद.

मळद ग्रामपंचायतचे कुठलेही पत्र या आधी मिळाले नाही. पुलाला तडे गेले त्याच दिवशी या पुलाची पाहणी करून तात्काळ नवीन पुलाचे इस्टीमेट तयार करण्यासाठी वरिष्ठांना सांगितले आहे. लवकरच याचे पुनर्निर्माण केले जाईल सध्या या पुलावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे
-साळुंके, सहायक अभियंता,
खडकवासला दौंड

मळद ग्रामपंचायतच्या (२७ आॅगस्ट १५)च्या सभेमध्ये या पुलाच्या नव्या बांधकामासंदर्भात चर्चा झाली होती. त्यानुसार या धोकादायक पुलाच्या कामाकरिता खडकवासलाच्या रावणगाव शाखेत लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुठल्याच अधिकाºयांनी याची पाहणी केली नाही. विशेष बाब म्हणजे या पत्राला त्यांच्या वरिष्ठांकडे देण्यातच आले नसल्याची बाब खुद्द सहायक अभियंता यांनी सांगितली. त्यामुळे शाखा अधिकारी कुठल्या प्रकारे काम करत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे .

वाहतूक नँरोगेज वरून मळद येथून दौंड बारामती हा रेल्वे मार्ग गेलेला आहे. या पूर्वी येथे नँरोगेज रेल्वे रूळ होता. मात्र, आता तो ब्रॉडगेज करण्यात आला आहे. त्यामुळे या कँनाल वरील नँरोगेज रुळाचा छोटा पुल रिकामा आहे. सध्या अतिशय अरुंद व कठडे नसलेल्या या पुलावरून वाहतूक सुरु आहे. मात्र, ही वाहतूक अतिशय धोकादायक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Web Title:  The bridges of canals at the molasses collapsed, the disadvantage of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे