उंड्री - एनआयबीएम रोडवर ब्रेक फेल टेंपोने वाहनांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:45 AM2018-01-25T05:45:26+5:302018-01-25T05:45:37+5:30

उंड्री - एनआयबीएम रोडवर आयशर टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने दोन - तीन गाड्यांना उडविले. एनआयबीएम रोडवर दोराबजी मॉलसमोर हा अपघात चारच्या सुमारास झाला. (एमपी ०९ डीजी १२५३) हा आयशर टेम्पो उंड्रीकडून कोंढवाकडे जात असताना उतारावर टेम्पोचालकाला ब्रेक निकामी झाल्याचे समजले व त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला, त्यातच हा रस्ता उताराचा .

 Bridging failure vehicles on the Andri-Nibm road | उंड्री - एनआयबीएम रोडवर ब्रेक फेल टेंपोने वाहनांना उडविले

उंड्री - एनआयबीएम रोडवर ब्रेक फेल टेंपोने वाहनांना उडविले

Next

कोंढवा : उंड्री - एनआयबीएम रोडवर आयशर टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने त्याने दोन - तीन गाड्यांना उडविले. एनआयबीएम रोडवर दोराबजी मॉलसमोर हा अपघात बुधवारी चारच्या सुमारास झाला. (एमपी ०९ डीजी १२५३) हा आयशर टेम्पो उंड्रीकडून कोंढवाकडे जात असताना उतारावर टेम्पोचालकाला ब्रेक निकामी झाल्याचे समजले व त्याचा टेम्पोवरील ताबा सुटला, त्यातच हा रस्ता उताराचा . टेम्पोचालकाने पुढे जात असलेल्या शाळेची मुले ने- आण करणाºया मारुती व्हॅन (एमएच १२ जेसी ८२७०) ला मागून उडविले. सुदैवानं त्यात शाळकरी मुले नव्हती, व्हॅनचालक सिद्धार्थ गेडाम (वय २८) व त्याची आई शीलाबाई गेडाम यांना पोटाला व डोक्याला मार लागला. त्यानंतर त्याने एक स्कूटरला उडविले, परंतु स्कूटरचालकाला किरकोळ दुखापत झाली व तो बाजूला फेकला गेला.
त्यानंतर ताबा सुटलेला टेम्पो विरुद्ध बाजूने येणा-या पाण्याचा टँकरला (एमएच ०४ सीजी ७५२४) समोरासमोर धडकला. ही धडक जोरात झाल्याने दोन्ही वाहनचालक जबर जखमी झाले आहेत. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलिसांनी घटनेची खबर मिळताच ताबडतोब जखमींना दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले.
कोंढवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत निंबाळकर व त्यांच्या सहका-यांनी त्वरीत अपघातग्रस्त वाहने हलविली व वाहतूक सुरळीत केली.

Web Title:  Bridging failure vehicles on the Andri-Nibm road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.