संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:26+5:302020-12-03T04:21:26+5:30
लोणीकंद : जीएसटी लेझर कन्फर्मेशन आले का नाही असे विचारल्याच्या कारणावरून शशीकांत नंदराम काकडे (रा. दहिवान वस्ती, ता. हवेली) ...
लोणीकंद : जीएसटी लेझर कन्फर्मेशन आले का नाही असे विचारल्याच्या कारणावरून शशीकांत नंदराम काकडे (रा. दहिवान वस्ती, ता. हवेली) यांना माहराण झाली. याप्रकरणी सतीश गुलाबराव खांदवे (लोहगाव, ता. हवेली)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. याबाबात लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पूर्ववैमनस्यातून एखाला मारहाण
घोडेगाव : पाच-सहा महिन्यापूर्वी पार्टीमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकास मारहाण करण्यात आली यामध्ये रामदास धोंडू आंबेकर (वय रा. पोखरी, काटळेवाडी ता. आंबेगाव ) हे जखमी झाले. याबाबत राजेंद्र भागू जोशी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास पोखरी गावाच्या हद्दीत घडली. याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.
घरोसमोर खरकटे पाणी टाकल्यावरून माराहण
लोणीकाळभोर : पत्नीने शेजाऱ्यांच्या घरासमोर खरकटे पाणी सांडल्याच्या कारणावरून शेजारच्यांनी तिच्या पतीला मारहाण केली. दत्तात्रय शंकरराव राऊत असे मारहाण झालेल्यांचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब लक्ष्णम कुंजीर हे जखमी झाले. या प्रकरणी बाळासाहेब लक्ष्मण कुंजीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३० नोव्हेेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारासघडली. याबाबत लोणीकाळभोर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
झऱ्यावर कपडे धुण्याच्या कारणावरून मारहाण
भोर : महिलेने झऱ्यावर कपडे धुण्याच्या कारणावरून तिला बोलणाऱ्यास महिलेचे पती व इतरांनी मारहाण केली. याप्रकरणी संपत बबन शिरवले , आशा संपत शिरवले, रोहित संपत शिरवले, विलास किसन शिरवले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अजय चंद्रकांत शिरवले (वय ३४, रा. शिरवली ता.भोर) असे माहराण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी अकराच्या सुमारास घडली. याबाबत भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेशी झालेल्या वादातून तिच्या पतीला मारहाण
इंदापूर : महिलेशी प्रापंचिक वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिच्या पतीला कोयत्याने मारहाण झाली. याप्रकरणी प्रवीण कानिफनाथ पवार यांनी अरुण विठ्ठल भोसले यांच्या विरोधात फिर्याद दिली. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अवसरी (ता. इंदापूर) येथे घडली. याप्रकरणी इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मुलीोंची छेड काढून केली मारहाण
शिरुर : शिरुर येथील सुशीला पार्क येथे निघालेल्या तिघी मैत्रिणींच्या ग्रूपला अडवून एकाने त्यांची छेड काढून तिघांसह त्यांच्या आणखी दोघा मित्रांना चाकूने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. त्याप्रकरणी प्रसाद लोंढे (रा. शिर्डी जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शिरुर येथे घडली. याप्रकरणी शिरुर पोलिसा गुन्हा दाखल झाला आहे.
कोरेगावा मोटारसायकची चोरी
रांजणगाव येथील कोरेगाव एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर लावलेली गाडी चोरट्याने हॅण्डल लॅाक तोडून लंपास केली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी देवीचरण अर्जन हातागळे (वय ३० रा. कोरेगाव) याने फिर्याद दिली असून त्याप्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.
कारमधून लाख रुपयांची चोरी
जेजूरी : जेजूरी गावातील मोरगाव चौक येथे पार्क केलेली मोटारकारच्या उघड्या खिडकीतून कारमधील एक लाख रुपयांची रोकड चोरट्यांने लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरण साधू गुलाब मेमाने (वय ५६, रा. पिसर्वे ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार जेजूरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.