संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:08+5:302020-12-05T04:15:08+5:30
-- दोन मुलाकडून वडीलांना मारहाण ओतूर : फोन सायलेंट मोडवर करू नकोस असे सांगितल्यामुळे व आईच्या व मुलाच्या जाँईंट ...
--
दोन मुलाकडून वडीलांना मारहाण
ओतूर : फोन सायलेंट मोडवर करू नकोस असे सांगितल्यामुळे व आईच्या व मुलाच्या जाँईंट अकाऊंटवरून पैसे काढले असे विचारल्यावरून मुलाने शेजाऱ्यांशी मिळून वडीलांना मारहाण केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओतूर येथील वाटखळ (ता. जुन्नर) येथे घडली. याबाबत समाधान ज्ञानेश्वर खुडे, नितीन ज्ञानेश्वर खुडे या दोन मुलांसह किरण वसंत खुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर शंकर खुडे (वय ४८, वाटखल, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
--
मुलाकडून वडीलांनाच विळ्याने मारहाण
भोर : वडिलांनी मुलाला विचारले की, तू शिवीगाळ का करतोस त्याचा राग मनात धरून मुलाने वडीलांच्या डोक्यात विळ्याने मारहाण केली. त्यामध्ये वडीलांच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रायरी (ता. भोर) येथे घडली. या प्रकरणी शशिकांत रघुनाथ किंद्रे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रघुनाथ मारूती किंद्रे (वय ६१, रायरी, भोर) यांनी भोर पोलिसात फिर्याद दाखल केली.
---
गोधडी अंथरण्यावरून पत्नीला मारहाण
मंचर : पांघरायची गोधडीखाली का अंथरली असे पत्नीने विचारल्यामुळे त्यावरून पतीने वाद घालत भांडण करून लाथाबुक्यासह खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने पत्नीला मारहाण केली. ही घटना पिंपरळगाव (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. याबात दत्तात्रय मारुती बांगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर विनंतरी दत्तात्रय बांगर (वय २८, रा. लिंबाचा मळा, पिंपळगाव) यांनी मंचर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
--
थुंकल्याच्या कारणावरून मारहाण
वडगाव निंबाळकर : घराच्या भितींवीर थुंकल्याची तक्रारी घरमालकाकडे केल्याने व थुंकलीले धुऊन काढलायला लावल्याने त्याचा राग मनात धरून दोघांनी तक्रार देणाऱ्यास मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेनऊच्या सुमारास मुर्टी (ता. बारामती) येथे घडली. याबाबत उत्तम शरद जगदाळ, अनिला उत्तम जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप मारूती जाधव (५४, रा. मुर्टी रा, बारामती) यांनी फिर्याद दाखल केली.
--
पती पत्नीची भांडणे सोडविण्यास गेलेल्याच मारहाण
---
लोणीकाळभोर : शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्याला व त्यांच्या मुलालाच पती पत्नी व त्यांच्या वडील आजोबा यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) येथे घडली. याबाबत सनी नंदुकामार तुपसौंदर्य, नंदकुमार दादा तुपसौंदर्य, मिना नंदकुमार तुपसौंदर्य, दादा तुपसौंदर्य यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत तुकाराम यादव राजगुरु (वय ५२) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
---
शेतीच्या विभागणीवरूनव सख्ख्या भावाकडून मारहाण
हवेली : भात शेतीच्या वाटणीच्या कारणावरून सख्ख्या भावानेच भावाला मारहाण करून पायरीवर डोके आपटून जखमी केले. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमरास मनेरवाडी (ता. हवेली) येथे घडली. याबाबत सुभाष उर्फ नागेश सुदाम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश सुदाम जाधव हे जखमी झाले असून याबाबत पूर्वा गणेश जाधव यानी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
----
निरेत दुचाकीची चोरी
जेजूरी : घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने लॉक तोडून चोरून नेली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मिलींद आनंदराव केंडे (वय ४८, निरा वार्ड, ता. पुरंदर) यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---
तळ्यातील पाणबुडी मोटार लंपास
रांजणगाव : ढोकसांगवी (ता. शिरुर) गावातील खंडोबा मंदिराच्या पाठीमागील तळ्यामध्ये तीन एचीपीची पाणबुडी मोटार चोरट्याने लंपास केली. ही घटना १५ व १६ नोव्हेंबर दरम्याम घडली. याबाबत नवनाथ बुधाजी डाळिंबकर यांनी रांजणगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.