सॉफ्ट टेनिस २०२१ स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंचे उज्वल यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:51+5:302021-02-23T04:18:51+5:30
चिन्मय मेहता, आयुषी इंगवले यांना सुवर्णपदक, आयंती दांदडेला रौप्यपदक, रिषी वुराला कांस्यपदक पुणे : जळगाव येथे १८ ते ...
चिन्मय मेहता, आयुषी इंगवले यांना सुवर्णपदक, आयंती दांदडेला रौप्यपदक, रिषी वुराला कांस्यपदक
पुणे : जळगाव येथे १८ ते २१ फेब्रुवारी यादरम्यान झालेल्या ८ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर आणि वरिष्ठ सॉफ्ट टेनिस २०२१ स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी दोन सुवर्णपदक, दोन रौप्यपदक आणि दोन कांस्यपदक मिळवत स्पर्धेत वर्चस्व गाजवले.
जळगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेतर्फे आयोजित केली होती. यामध्ये पुण्यासह जळगाव, बुलडाणा, मुंबई, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद आणि सोलापूर या १० जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते.
पुण्याच्या आयुषा इंगवले हिने सब-ज्युनिअर गटामध्ये रौप्यपदक मिळवले. वरिष्ठ गटात आयुषाने सुवर्णपदक मिळवले. पुण्याच्या चिन्मय महेता याने वरिष्ठ गटात सुवर्णपदकासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा मान पटकावला.
अयाती दांदडे हिने सब-ज्युनिअर गटात आणि वरिष्ठ गटामध्ये रौप्यपदक मिळवत दोन पदकांची कमाई केली. रिषी वुरा याने वरिष्ठ गटात कांस्यपदक मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटने अध्यक्ष सुनील पूर्णपाने, सहसचिव रवींद्र सोनावणे, महासचिव अमोल पाटील, जळगाव सचिव दीपक आर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.
आयुषा इंगवले निकालः
वरिष्ठ गटः उप-उपांत्यपूर्व फेरीः आयुषा वि.वि. वैष्णवी देशमुख (जळगाव) २-०;
उपांत्यपूर्व फेरीः आयुषा वि.वि. प्रेरणा देशमुख (उस्मानाबाद) २-०;
उपांत्य फेरीः आयुषा वि. वि. पौर्णिमा चव्हाण (जळगाव) २-१;
अंतिम फेरीः आयुषा वि. वि. अयाती दांदडे (पुणे) ३-०.