मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठं काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:07 PM2021-06-10T18:07:51+5:302021-06-10T18:09:27+5:30

Chandrakant Patil:  मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर भाजपनं जोरदार आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे.

British did everything in Mumbai what did the Shiv Sena in Mumbai asks Chandrakant Patil | मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठं काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठं काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

Next

Chandrakant Patil:  मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर भाजपनं जोरदार आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भर पडली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेतील कारभारावरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ब्रिटिशांनी सगळं मुंबईत केलं, पण शिवसेनेनं मुंबईत काय केलं? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी; पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला 

"गेल्या २० वर्षां जास्त काळापेक्षा मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात देखील ते सत्तेत आहे. तसेच ४० हजारांचे त्यांचं बजेट असते. ५८००० कोटींच्या ठेवी आहे . पण तरीदेखील मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहे. येत्या महापालिकेत मुंबईकर शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो शिकवतील", असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला. 

"मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. ब्रिटिशांनीच सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं? याआधी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनीही काही केलं नाही. मुंबईकर जनता यावेळी शिवसेनेला माफ करणार नाही", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

संजय राऊतांनी दिल्या चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 
नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो
 

Web Title: British did everything in Mumbai what did the Shiv Sena in Mumbai asks Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.