पुणे जिल्ह्यातील धावडीत चोरट्यांचा धुमाकूळ, ४ घरे फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:05 PM2018-01-17T12:05:41+5:302018-01-17T12:09:39+5:30
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील धावडी (ता. भोर) येथे मंगळवार (दि. १६) चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका रात्रीत चार घरे फोडली असून यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.
नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील धावडी (ता. भोर) येथे मंगळवार (दि. १६) चोरट्यांनी धुमाकूळ घालून एका रात्रीत चार घरे फोडली असून यामध्ये सुमारे सव्वा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. मंगेश दरेकर यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. १६ रोजी रात्रीच्या वेळी १ ते २ यावेळेत धावडी येथील मंगेश विष्णू दरेकर यांच्या बंद अवस्थेत असलेला घराचा दरवाजा फोडून रोख रक्कम, सोने असा एक लाख २० हजार रुपयाचा ऐवज चोरीस गेला आहे. वाईद आब्बास पटेल यांच्या घरातील सोने, रोख रक्कम, संतोष मारुती राऊत यांच्या घरातील कपडे व इतर साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत होते. संपत गणपत दरेकर यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना पोलिसांना कळताच या ठिकाणी हजर होत पोलिसांनी माहिती घेतली व पंचनामा करुन सुमारे सव्वा लाख रुपयाची चोरी झाली असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार तडाखे करीत आहे.