तुटलेली झाकणे; नित्कृष्ट दर्जाच्या जाळ्या, 'चेंबर बनले धोकादायक', पुण्यातील रस्ते बिकट अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:11 PM2022-11-21T20:11:24+5:302022-11-21T20:11:33+5:30

शहरात अनेक ठिकाणी चेंबरच्या लोखंडी जाळ्यांची अनेकदा चोरी होते

broken cover Poor quality nets chambers become dangerous Pune roads in bad condition | तुटलेली झाकणे; नित्कृष्ट दर्जाच्या जाळ्या, 'चेंबर बनले धोकादायक', पुण्यातील रस्ते बिकट अवस्थेत

तुटलेली झाकणे; नित्कृष्ट दर्जाच्या जाळ्या, 'चेंबर बनले धोकादायक', पुण्यातील रस्ते बिकट अवस्थेत

Next

पुणे : शहरातील विविध रस्त्यावरील ड्रेनेज आणि पावसाळी चेंबरची झाकणे तुटली असून ती धोकादायक बनली आहेत. या तुटलेल्या चेंबरमध्ये अनेकदा नागरिक झाडांच्या फांदया , विटा आणि दगड ठेवल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.

शहरात ड्रेनेज आणि पावसाळी लाईन मोठया प्रमाणात आहे. या लाईनवर रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला चेंबर आहेत. अनेक चेंबरवरील जाळया तुटलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील चेंबर खाली खचले आहेत. तर काही ठिकाणी चेंबर हे रस्त्याच्यावर आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा याठिकाणी अपघात झाले आहेत. या तुटलेल्या चेंबरमध्ये अनेकदा नागरिक झाडांच्या फांदया , विटा आणि दगड ठेवत आहेत. चेंबरच्या जाळी मध्ये प्लँस्टिकचे कागद आणि कचरा साचला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी चेंबर तुंबले जातात. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले जाते. शहरातील अनेक रस्त्यावरील चेंबरची सातत्याने दुरूस्ती करण्यात आहे. तरीही चेंबरच्या जाळ्या सातत्याने तुटत आहेत . त्यामुळे चेंबरच्या जाळ्या निकृष्ट दजाेच्या असल्याचे स्पष्ट होत आहे.

चेंबरच्या जाळयाचीही होते चोरी

शहरात अनेक ठिकाणी चेंबरच्या जाळया या लोखंडी असतात. या लोंखडी जाळयाची अनेकदा चोरी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी जाळया नसल्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत.

चेंबर दुरूस्तीवर ३८ लाख खर्च

१२ मीटरवरील रस्त्यामधील चेंबरची दुरूस्ती पथ विभागाच्या मुख्य खात्या माफेत केली जाते. १२ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावरील चे़बरची दुरूस्ती क्षेञिय कायाेलय स्तरावर केली जाते. लोखंडी जाळीच्या एका चेंबरची किमंत सुमारे २हजार ५०० ते ३ हजार रुपये आहे. सिमेंटच्या एका चेंबरची किमंत सुमारे १हजार ५०० रुपये आहे. पालिकेच्या पथ विभागाने पावसाळयामध्ये १ हजार १८४ चेंबरची दुरूस्ती केली आहे. एका चेंबरच्या दुरूस्तीसाठी ३हजार ४०० रूपये खर्च येत आहे असे पालिकेक्षस पथ विभाग सातत्याने चेंबरची दुरूस्ती करत आहे असे पालिकेच्या पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.

Web Title: broken cover Poor quality nets chambers become dangerous Pune roads in bad condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.