तुटलेले पूल, साईडपट्ट्या अन् कच-याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 06:39 AM2017-10-30T06:39:21+5:302017-10-30T06:39:24+5:30

वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले

Broken pools, sidebars and trash-shaft | तुटलेले पूल, साईडपट्ट्या अन् कच-याचे ढीग

तुटलेले पूल, साईडपट्ट्या अन् कच-याचे ढीग

Next

लोणी काळभोर : वसुली जोरात मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष... हे चित्र पुणे-सोलापूर महामार्गाचे आहे. तुटलेल्या पुलांची वर्षानुवर्षे दुरूस्ती न होणे व रस्त्यालगतच्या खचलेल्या साईडपट्ट्या तसेच जागोजागी पडलेले कच-याचे ढीग दिसत आहेत. प्रत्येक वेळी एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतरच शासन व्यवस्था काम करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या भागातील चारपदरी रस्त्याचे काम ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर केले. गेली १२ वर्षे टोलवसुलीचे काम नियमानुसार सुरू आहे. परंतु रस्तादुरूस्ती समवेत प्रवाशांना इतर सुविधा देण्याबाबत तसेच महामार्गालगतच्या संरक्षक जाळ्या, रुग्णवाहिका आदी सोयीसुविधा देण्याबाबत सदर कंपनी असमर्थता दाखवत आहे.
नाही म्हणायला अधुनमधून महामार्गावर असलेले खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येते. पण त्यामुळे रस्त्याची उंची वाढली असून लगत असलेल्या साईडपट्ट्या न भरल्याने बºयाच ठिकाणी सुमारे एक फूट उंचीचे खड्डे पडलेले दिसत आहेत. ते भरले नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक खड्डे लोणी फाटा, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ मंदिर व यवत दरम्यान अनेक ठिकाणी पडले आहेत.
सन २००४ मध्ये चौपदरी महामार्ग तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये जनावरे व नागरिक महामार्गावर येऊन अपघात होऊ नयेत, म्हणून लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु सध्या बहुतांश ठिकाणची जाळी गायब झालेली आहे.
टोल कंपन्यांना महामार्गावर एखादा अपघात झाला तर जखमींना तातडीची मदत मिळावी, म्हणून अ‍ॅम्ब्युलन्स व वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, ही सुविधाही उपलब्ध नसल्याने अपघात झाला तर पोलिसांनाच याची पूर्तता करावी लागते. तसेच रस्त्याच्या मध्यावर असलेले दुभाजक अवघे ९ इंच उंचीचे असल्याने अपघातसमयी एखादे वाहन भरधाव वेगात असेल तर थेट ते ओलांडून पलीकडे जाऊन अपघाताच्या तीव्रतेत वाढ होते. यामुळे अनेकजण प्राणास मुकले आहेत.
मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक केली जाते. वाहतूक करताना वाळू महामार्गावर सांडते. या सांडलेल्या वाळूवरून अनेक दुचाकी वाहने घसरून अपघात झालेले आहेत. कधी हात-पाय मोडण्यावर भागते तर कधी दुचाकीचालकाचा जीवही जातो.

Web Title: Broken pools, sidebars and trash-shaft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.