आजारी बहिणीचा खून करून भावाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:02 AM2024-06-23T11:02:48+5:302024-06-23T11:04:10+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साफिया आजारी असायची. तिच्यावर कुटुंबीयांकडून उपचारही केले जात होते. मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात असताना ती आक्रमक व्हायची. घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची.

Brother kills sick sister and fakes suicide in pune | आजारी बहिणीचा खून करून भावाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, पण...

आजारी बहिणीचा खून करून भावाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, पण...

किरण शिंदे

पुणे : सख्ख्या १६ वर्षीय बहिणीचा खून करून १८ वर्षीय भावाने तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात भलतंच समोर आलं. आजारी असणाऱ्या बहिणीचा भावानेच खून केल्याचे निष्पन्न झालं. हा संपूर्ण प्रकार घडलाय हडपसरच्या वैदवाडी परिसरात. सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र आता भावा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, वैदवाडी हडपसर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारिख सुलेमान अन्सारी (वय १८) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साफिया आजारी असायची. तिच्यावर कुटुंबीयांकडून उपचारही केले जात होते. मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात असताना ती आक्रमक व्हायची. घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची. घटनेच्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजी देखील असाच प्रकार घडला. मयत साफिया भाऊ शारीखच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली. दोघात झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात शारीख  याने गळा दाबला. यात साफीयाचा मृत्यू झाला. 

त्यानंतर आपल्या हातातून गुन्हा घडल्याचे लक्षात आल्यानंतर शारीख घाबरला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने घरातच साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना ही घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधीच साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबूल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मोडवे करीत आहेत.

Web Title: Brother kills sick sister and fakes suicide in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस