मावसभावानेच केला बहिणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:33 AM2018-08-13T01:33:09+5:302018-08-13T01:33:33+5:30

मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मावसभावाने अल्पवयीन मावसबहिणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला आहे.

Brother Raped sister | मावसभावानेच केला बहिणीवर बलात्कार

मावसभावानेच केला बहिणीवर बलात्कार

googlenewsNext

मंचर : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मावसभावाने अल्पवयीन मावसबहिणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला आहे. याप्रकरणी मावसभावाच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
मूळ जवळे (ता. पारनेर) येथील ठाकर समाजातील कुटुंब मजुरीसाठी मेंगडेवाडी येथे आले होते. संबंधित कुटुंबप्रमुखाची अल्पवयीन मुलगी २ वर्षांपूर्वी मेंगडेवाडी येथे तिच्या वडिलांकडे राहण्यास आली. तिचा मावसभाऊसुद्धा ५ वर्षांपासून मेंगडेवाडी येथे राहत होता. २० जुलैला या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले.
पहाटे ५ वाजता या मुलीला मोटारसायकलवरून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सकाळी ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. चौकशी केली असता मावसभावाने वारंवार बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याची माहिती या अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांना दिली.
घरातील जवळचे प्रकरण असल्यामुळे या कुटुंबाने तक्रार न देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. संबंधित मुलीने माझी कोणाविरुद्ध काहीएक तक्रार नाही, असा लेखी जबाब पोलिसांना दिला. अल्पवयीन मुलीच्या मुलाला ससून रुग्णालयात ठेवण्यात आले, तर मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी या मुलीला महिला बालकल्याण समिती शिवाजीनगर पुणे येथे घेऊन गेल्यानंतर तिची चौकशी केली असता या मुलीने झालेली आपबीती सांगितली. त्यानंतर महिला बालकल्याण समितीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.
यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. मावसभावानेच राहत्या घरी मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याने ती गरोदर राहिली. तिचे बाळंतपणाचे दिवस पूर्ण झाल्याने तिने अपत्यास जन्म दिला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे अधिक तपास करीत आहेत.
त्या अल्पवयीन मुलीला वढू येथील माहेर संस्थेत दाखल करण्यात आले आहे, तर अपत्यास आळंदी येथील शिशुगृहात ठेवले आहे. आरोपीला आज न् यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Brother Raped sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.