आत्येभावानेच केले मामेबहिणीवर अत्याचार; ती ४ महिन्यांची गरोदर, नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:19 PM2022-05-27T20:19:27+5:302022-05-27T20:19:38+5:30

डीएनए अहवाल सकारात्मक आल्याने वैद्यकीय पुराव्याआधारे मामेबहिणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले

brother sexual harasse his sister She is 4 months pregnant brother 20 years punished | आत्येभावानेच केले मामेबहिणीवर अत्याचार; ती ४ महिन्यांची गरोदर, नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी

आत्येभावानेच केले मामेबहिणीवर अत्याचार; ती ४ महिन्यांची गरोदर, नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext

पुणे : चुलतीकडे सोडण्यासाठी जात असताना अल्पवयीन मामेबहिणीवर आत्येभावानेच अत्याचार केले. यात पीडिता गरोदर राहिली. या प्रकरणात पीडिता फितूर झाली. परंतु, डीएनए अहवाल सकारात्मक आल्याने वैद्यकीय पुराव्याआधारे मामेबहिणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले अन् २२ वर्षीय आत्येभावास न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला. दंडाची रक्कम पीडितेस देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्ष कारावास भोगावा लागेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 2015 साली वानवडी परिसरात हा प्रकार घडला. आरोपीने चुलतीकडे सोडण्यास जाताना हांडेवाडी रोड येथील सेनिंग पार्कच्या कच्च्या रस्त्याने फिर्यादीस नेउन जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला चुलतीच्या घरी सोडले. अत्याचाराच्या चार महिन्यानंतरही मासिक पाळी न आल्याने पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी, आरोपीविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये डॉक्टर, सहायक रासायनिक विश्लेषक रोहन शिंदे, तपासी अंमलदार राणी काळे, पोलीस उपनिरीक्षक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी बी. एस. लोखंडे व हवालदार ए. एस. गायकवाड यांनी सहकार्य केले.

Web Title: brother sexual harasse his sister She is 4 months pregnant brother 20 years punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.