विमाननगरमध्ये घरफोडी करणाऱ्या भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:45+5:302021-06-26T04:08:45+5:30
पुणे : घराचा दरवाजा उचकटून तब्बल ३५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा भावांना अटक केली. ...
पुणे : घराचा दरवाजा उचकटून तब्बल ३५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा भावांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
राकेशकुमार सरोज (वय ३०), राजेशकुमार सरोज (वय ३३, दोघे रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. १९ ते २० जुलै २०१९ दरम्यान विमाननगर परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी यांचे घर बंद असताना आरोपींची त्याच्या घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने, दोन रोलेक्स कंपनीची घड्याळे असा एकूण ३५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, मुद्देमाल जप्त करण्यासाठी व इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली.