Pune crime: भावाच्या मुलानेच केले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल, गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 25, 2023 18:48 IST2023-11-25T18:47:57+5:302023-11-25T18:48:41+5:30
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune crime: भावाच्या मुलानेच केले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल, गुन्हा दाखल
पुणे : भावाच्या मुलाने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला आहे. याबाबत येरवडा परिसरात राहणाऱ्या एका ५८ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी यश उर्फ अनिकेत प्रसन्न भट (रा. गुजरात) हा तक्रारदार महिलेच्या भावाचा मुलगा आहे.
महिलेचे फोटो मॉर्फ करून आरोपीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते फोटो पोस्ट केले आहेत. यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल कण्र्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.