बीआरटी बसच्या नियोजनाचे ‘ब्रेकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:05 AM2018-08-28T03:05:51+5:302018-08-28T03:06:12+5:30

‘पीएमपी’ प्रयत्नशील : ठेकेदारांनी आणले जेरीस; पाच मार्गावर बसही मिळेना

BRT bus planning 'breakdown' | बीआरटी बसच्या नियोजनाचे ‘ब्रेकडाऊन’

बीआरटी बसच्या नियोजनाचे ‘ब्रेकडाऊन’

Next

राजानंद मोरे 

पुणे : बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गातील बसचे नियोजन करताना पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. ठेकेदारांकडून पाच मार्गांवर अपेक्षित बस मिळत नसल्याने प्रशासनाला बसमध्ये दररोज ‘काटकसर’ करून प्रवाशांना सेवा द्यावी लागत आहे. ‘पीएमपी’च्या मालकीच्या बसची मार्गावरील संख्या तुलनेने चांगली असली तरी ठेकेदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने प्रशासन जेरीस आले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पाच मार्गांवर ‘बीआरटी’ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या दापोडी ते निगडी मार्गासह संगमवाडी ते विश्रांतवाडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड आणि येरवडा ते वाघोली हे पाच मार्ग आहेत. डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजा असलेल्या बस बीआरटी मार्गावर सोडाव्या लागतात. सध्या ‘पीएमपी’च्या मालकीच्या सुमारे ३०० बस या प्रकारच्या असून, ठेकेदारांकडील ६५३ बस बीआरटी योग्य आहेत. ‘पीएमपी’च्या संचलन विभागाने या पाचही मार्गांसाठी सुमारे पावणे सहाशे बसचे नियोजन केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक २२७ बस नव्याने सुरू झालेल्या दापोडी ते निगडी मार्गासाठी आहेत. तर येरवडा व वाघोली मार्गावर १५१, सांगवी फाटा ते किवळे मार्गावर ११८, संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्गावर ६६ तर नाशिक फाटा ते वाकड मार्गावर १५ बस आहेत.

ठेकेदारांकडील बस नवीन असल्याने ‘पीएमपी’ने सुरुवातीला बीआरटी मार्गांवर केवळ त्यांच्याच बसला प्राधान्य दिले. बसच्या संख्येनुसार एका-एका ठेकेदाराकडे एक मार्ग देण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्याने मार्ग वाढत गेले. पण त्यातुलनेत बस अपुऱ्या पडू लागल्याने आता ‘पीएमपी’ला स्वत:च्या बसही या मार्गांवरून सोडव्या लागत आहेत. मात्र, ठेकेदारांकडून अपेक्षित बस मिळत नसल्याने नियोजन कोलमडत आहे. ५७३ बस मार्गावर येणे अपेक्षित असताना सोमवारी (दि. २७) केवळ ४४३ बस मार्गावर आल्या.

ठेकेदारांकडून मिळेना साथ : आर्थिक नुकसान
४बीआरटी मार्गावर अपेक्षित बस सोडण्यासाठी ठेकेदारांकडून साथ मिळत नसल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे. आधीच कमी बस त्यात ब्रेकडाऊनची संख्या अधिक असल्याने ‘पीएमपी’चे नियोजन कोलमडत आहे. तसेच आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

४प्रवाशांचीही गैरसोय होत असून वेळेत अतिरिक्त बस उपलब्ध करून देणेही अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ठेकेदारांना ठोठावण्यात येणाºया दंडाच्या रकमेत वाढ करण्यासह कारवाईच्या विविध पर्यांयावर विचार सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

२५० बस उपलब्ध
४सध्या ठेकेदारांना बीआरटी मार्गासाठी ३४२ बसचे नियोजन देण्यात आलेले आहे. पण तेवढ्याही बस मिळत नाहीत. त्यांच्याकडून सरासरी केवळ २५० बसच उपलब्ध होत आहेत.
४तर पीएमपीच्या मालकीच्या ३०७ बसपैकी
२३१ बसचे नियोजन केले जात आहे.
त्यापैकी जवळपास २०० बस सध्या मार्गावर धावताहेत.
४ठेकेदारांकडून १०० हून अधिक बस कमी
मिळत आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून
देण्यात आली.

Web Title: BRT bus planning 'breakdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.