सिंहगड रस्त्यावरही धावणार बीआरटी?

By admin | Published: September 27, 2016 04:33 AM2016-09-27T04:33:37+5:302016-09-27T04:33:37+5:30

औंध ते जंगली महाराज रस्ता आणि संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावरील बीआरटी मार्गाचे काम सुरू केल्यानंतर आता प्रशासनाकडून लवकरच सिंहगड रस्त्यावरही

BRT running on Sinhagad road? | सिंहगड रस्त्यावरही धावणार बीआरटी?

सिंहगड रस्त्यावरही धावणार बीआरटी?

Next

पुणे : औंध ते जंगली महाराज रस्ता आणि संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावरील बीआरटी मार्गाचे काम सुरू केल्यानंतर आता प्रशासनाकडून लवकरच सिंहगड रस्त्यावरही बीआरटी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी या रस्त्याच्या रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीकडून हाती घेण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आधीच गर्दीने गजबजलेल्या सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावलेला असतानाच; या मार्गावर बीआरटी धावणे शक्य आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
केंद्र शासनाच्या जेएनएनयूएनआरएम योजनेअंतर्गत महापालिकेने बीआरटी मार्गांच्या उभारणीसाठी सुमारे ११२ हून अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आलेले आहे. मात्र, त्यातील केवळ ३० किलोमीटर मार्गावर अद्यापपर्यंत बीआरटी सुरू केली आहे. त्यामुळे उर्वरित मार्गावर टप्प्याटप्प्याने बीआरटी सुरू करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि संगमवाडी ते वाघोली या मार्गावर बीआरटीसेवा सुरू करण्यात आली असून पुढील टप्प्यात औंध ते महापालिका भवन जंगली महाराज रस्त्यामार्गे, तर संगमवाडी ते शिवाजीनगर आणि महापालिका भवन असा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचे कामही प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचा पुढच्या टप्प्यात आता प्रशासनाकडून सिंहगड रस्त्याचे नियोजन हाती घेण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

झाला होता विरोध
महापालिका प्रशासनाकडून २०११ मध्ये या मार्गावर बीआरटी सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र, त्या वेळी या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी बीआरटी मार्गास विरोध केला होता.
त्यानंतर या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनेही केली होती. त्यातच पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय आल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मार्गावर बीआरटीची रचना
कशी असेल, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. स्वारगेट बस स्थानकापासून ते पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंत हा मार्ग प्रस्तावित असल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेने बीआरटी मार्गांच्या उभारणीसाठी सुमारे ११२ हून अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले.

सिंहगड रस्त्याच्या रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीकडून हाती घेण्यात आले आहे़

Web Title: BRT running on Sinhagad road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.