बीआरटीचा पहिल्याच दिवशी गोंधळ, दहा वर्षांनंतर धावलेल्या बसला अडथळ्यांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:09 AM2018-08-25T01:09:15+5:302018-08-25T01:09:42+5:30

मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

BRT's first day of clutter, bus barrier run after ten years | बीआरटीचा पहिल्याच दिवशी गोंधळ, दहा वर्षांनंतर धावलेल्या बसला अडथळ्यांची शर्यत

बीआरटीचा पहिल्याच दिवशी गोंधळ, दहा वर्षांनंतर धावलेल्या बसला अडथळ्यांची शर्यत

Next

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावर १० वर्षांनी आज शुक्रवारी ‘पीएमपी’ची बस धावली. निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनलचेही उद्घाटन करण्यात आले. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखविला. मात्र, पहिला दिवस प्रवाशांचा गोंधळात गेला. मार्गात अनेक ठिकाणी महामेट्रोची खोदाई व रखडलेल्या कामांचा अडथळे पार करीत बस धावली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनलमध्ये झालेल्या कार्यक्रमास सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.

मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेचौदा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी नियोजन केले होते. दरम्यान सुरक्षिततेबाबत अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने आयआयटी पवईच्या मदतीने सुरक्षिततेबाबत उपाययोजना करून याचिकाकर्त्यां सोबत मार्गावर तीन वेळा बसची चाचणी घेतली. त्यानंतर न्यायालयाने बीआरटीएस बस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखविला. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बीआरटी प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या मार्गावर २७३ बस धावणार आहेत. एका दिवसाला २२०० फेऱ्या होतील. एका मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अपर इंदिरानगर, कोथरूड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. दापोडी ते निगडी मार्ग अनेक ठिकाणी खुला आहे. त्यामुळे खासगी वाहने सहजपणे या मार्गात घुसत आहे. हा मार्ग केवळ पीएमपी बससाठी असतानाही शुक्रवारी खासगी वाहनांची घुसखोरी झाली. मात्र, या ठिकाणी कोणतेही सूचना फलक नसल्याने खासगी वाहनांची फसगत होत आहे.

प्रवाशांची उडाली तारांबळ
या मार्गावर काही ठिकाणी पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला होता. भोसरी-आळंदी ते चिंचवड, वाकड, हिंजवडी आणि पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, किवळे, रावेत परिसरात जाणाºया प्रवाशांची तारांबळ उडाली होती. डेडीकेटेड लेनमध्ये चिंचवड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रवासी नेहमीप्रमाणे बसथांब्यावर होते. नवीन बस थांबा माहीत नसल्याने कोणत्या बसथांब्यावर थांबायचे याबाबत गोंधळ उडत होता. तर अंतर्गत प्रवास करणारे नागरिकांचाही गोंधळ उडत होता.

खासगी वाहनांना दंड
४पीएमपीच्या ११३ गाड्या, तर भाडेतत्त्वावरील १३९ गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील २१ गाड्या अशा एकूण २७३ गाड्या या मार्गावर धावतील. बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, इतर वाहनांना बंदी आहे. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे.

Web Title: BRT's first day of clutter, bus barrier run after ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.