Pune Crime| चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:19 PM2022-09-23T18:19:22+5:302022-09-23T18:22:30+5:30

चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून...

Brutally murdering his wife with an ax on suspicion of character Pune Crime news | Pune Crime| चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा निर्घृण खून

Pune Crime| चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा निर्घृण खून

Next

टाकळी हाजी (पुणे) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी (दि. 22) रोजी रात्री ललिता पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. महादेव काळे या महिलेचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम (ता. करमाळा जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता. लग्न झाल्यापासून त्या दोघांचे कायमच भांडण होत होते. काल गुरुवारी (दि. 22) सायंकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली, तेव्हा दोघांचे भांडण झाले होते. त्यावेळी तो पत्नीला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हिचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे, असे ललिताची बहीण चांदणी हिने सांगितले असून शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औट पोस्ट येथे रितसर खुनाची फिर्याद दाखल केली आहे.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोटारसायकलचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे पाहिले तेव्हा तो मोटार सायकल चालू करून पळून चाललेला दिसून आला. त्याच्या घरात ललिता हिचा मृतदेह व त्याच्या शेजारी एक दीड वर्षांची मुलगी दिसली. त्यानंतर शेजाऱ्यांनी इतरांना सांगून पोलिसांना कल्पना दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस अंमलदार दिपक पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Brutally murdering his wife with an ax on suspicion of character Pune Crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.