बीएस्सीनंतर परदेशात इंजिनिअरिंग पदवी

By admin | Published: September 17, 2014 12:23 AM2014-09-17T00:23:26+5:302014-09-17T00:23:26+5:30

गेल्या काही वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे राज्यातील नामांकित महाविद्यालयांनासुद्धा विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत.

B.Sc. Engineering Degree abroad | बीएस्सीनंतर परदेशात इंजिनिअरिंग पदवी

बीएस्सीनंतर परदेशात इंजिनिअरिंग पदवी

Next
पुणो : गेल्या काही वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे राज्यातील नामांकित महाविद्यालयांनासुद्धा विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. परंतु, अनेक विद्याथ्र्याना परदेशातील शिक्षणाची आणि नामांकित विद्यापीठाची पदवी घेण्याची ओढ असते. त्यामुळे आता काही महाविद्यालये अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीशी करार करून विद्याथ्र्याना बीएस्सीनंतर इंजिनिअरिंगची पदवी उपलब्ध करून देत आहेत.
फग्र्युसन महाविद्यालयाने पेन स्टेट युनिव्हर्सिटीशी करार केला आहे. त्यामुळे फग्र्युसन महाविद्यालयात बीएस्सी पदवी पूर्ण करणा:या विद्याथ्र्याना पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये दोन वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर बीएस्सी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त करता येणार आहे. त्यामुळे केवळ इयत्ता बारावीनंतरच नाही, तर बीएस्सीनंतरही इंजिनिअरिंगची पदवी घेता येणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळिग्राम म्हणाले, की गेल्या वर्षभरापासून डीईएस आणि पेन स्टेट युनिव्हर्सिटीची चर्चा सुरू होती. फग्र्युसनने बीएस्सीच्या अभ्यासक्रमात आणखी काही घटकांचा समावेश करून एक स्वतंत्र अभ्यासक्रम पेन स्टेटला पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली असून, फग्र्युसनमध्ये तीन वर्षाचा बीएस्सीचा अभ्यासक्रम पूर्ण करणा:याला पेन स्टेटची बीएस्सी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी घेता येणार आहे. परंतु, विद्याथ्र्याना दोन वर्षे पेन स्टेटमध्ये चार सेमिस्टर पूर्ण करावे लागतील. त्यासाठी प्रत्येक वर्षासाठी  सुमारे 72 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. (प्रतिनिधी)
 
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाकडून फग्र्युसन महाविद्यालयास स्वायत्तता मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु, विद्यापीठाकडून स्वायत्तता देण्याबाबत उशीर होत आहे. मात्र, स्वायतत्ता मिळाल्यानंतर विविध देशांतील नामांकित विद्यापीठांशी करार करून विद्याथ्र्याना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न फग्र्युसनतर्फे केला जाणार आहे.
- किरण शाळिग्राम,
नियामक मंडळ सदस्य, डीईएस

 

Web Title: B.Sc. Engineering Degree abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.