वीसगाव खोऱ्यात बीएसएनएल सेवा ठप्प
By admin | Published: April 25, 2017 03:58 AM2017-04-25T03:58:33+5:302017-04-25T03:58:33+5:30
वीसगाव खोऱ्यात नेरे (ता़ भोर) परिसरात बीएसएनएल केबल तुटल्याने चार दिवसांपासून बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीककर्ज वाटप रखडले आहे़
नेरे : वीसगाव खोऱ्यात नेरे (ता़ भोर) परिसरात बीएसएनएल केबल तुटल्याने चार दिवसांपासून बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीककर्ज वाटप रखडले आहे़
बीएसएनएल कंपनीची केबल नेरे येथे चार दिवसांपूर्वी तर खानापूर येथे दोन दिवसांपूर्वी तुटलेली आहे़ वीसगाव खोऱ्यात नेरे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती व महाराष्ट्र बँक आहे. या बँका आॅनलाइन केलेल्या आहेत़ वारंवार बीएसएनएल कंपनीची सेवा काही ना काही कारणाने खंडित होत असते़ यामुळे बँकांचे व्यवहार थांबून राहतात. याचा नाहक त्रास शेतकरीवर्गाला सहन करावा लागत आहे.
सध्या मार्चअखेर होऊन पीककर्ज घेण्यासाठी पुणे जिल्हा बँकेत गर्दी उसळली आहे़ मात्र बीएसएनएलची सेवा ठप्प आसल्याने चार दिवस व्यवहार लांबणीवर पडले आहेत़ शेतकऱ्यांनी हातउसने पैसे घेऊन सेवा सोसायट्यांमध्ये करोडो रुपये मार्चअखेर भरले आहेत़ (वार्ताहर)