अनुदानाअभावी बीएसएनएलच्या ६ केंद्रांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:06 AM2019-01-13T01:06:54+5:302019-01-13T01:06:56+5:30

बारामती तालुक्यातील प्रकार : वीजबिलापेक्षा डिझेलवर होतोय दुप्पट खर्च

BSNL's six centers are in lack of electricity | अनुदानाअभावी बीएसएनएलच्या ६ केंद्रांची बत्ती गुल

अनुदानाअभावी बीएसएनएलच्या ६ केंद्रांची बत्ती गुल

googlenewsNext

बारामती : बीएसएनएलच्या तालुक्यातील जवळपास २१ ‘एक्स्चेंज स्टेशन’पैकी बारामती, कºहावागज, कºहाटी, शिर्सुफळ, जळगाव कडेपठार, उंडवडी या ६ ठिकाणचा वीजपुरवठा बिल न भरल्याने बंद करण्यात आला आहे. यामुळे हे सर्व केंद्र डिझेल जनित्रांवर सुरू असून मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याने तालुक्यातील सेवा खोळंबली आहे. महिन्याला येणाऱ्या वीजबिल्याच्या दुप्पट खर्च हे जनित्र चालवण्यावर होत आल्याने हे केंद्र डबघाईला येणार आहेत. केंद्र सरकारकडून अनुदान न मिळाल्याने ही अवस्था झाल्याची माहिती पुढे आली आहे.


बारामती, कºहावागज, कºहाटी, शिर्सुफळ, जळगाव कडेपठार, उंडवडी या ६ ठिकाणचा वीजपुरवठा बिल न भरल्याने बंद करण्यात आला आहे. येथील मोबाइल साइटवर इंजिनाची व्यवस्था असल्याने त्याचा वापर दिवसभर करावा लागत आहे. सकाळी १० ते सायं. ६ किंवा जास्त वेळ इंजिन चालू ठेवावे लागते. त्यासाठी महिन्याला ५८० लिटर डिझेल मिळते. मिळालेला ५८० लिटर डिझेलचा साठा महिन्याच्या सुरुवातीला ९ तारखेलाच संपला आहे. उर्वरित दिवसांत करायचे काय, असा प्रश्न बीएसएनएलच्या अधिकाºयांना पडला आहे. त्यासाठी येथील अधिकाºयांनी पेट्रोलपंप मालकाला विनंती करून २०० लिटर डिझेल उधार आणून काम चालू ठेवले आहे.


बारामती न्यायालय परिसरातील केंद्राला ७० लिटर, उंडवडी येथील केंद्राला १२५ लिटर, जळगाव कप येथील केंद्राला ६० लिटर, एमआयडीसी येथील केंद्राला ४८० लिटर, शिर्सुफळ ४५ लिटर डिझेल महिन्यासाठी मंजूर आहे. मात्र, वीजबिल न भरल्याने हे सर्व केंद्र डिझेल जनित्रांवर सुरू असल्याने केवळ ९ दिवसांतच सर्व डिझेल संपल्याने यापुढे काय करायचे, असा प्रश्न या केंद्रापुढे निर्माण झाला आहे.


विद्युत विभागाचे वीजबिल भरण्यासाठी दिल्ली येथून अनुदान मुंबई येथील सर्कल आॅफिस येथे येते. त्यानंतर मुंबई आॅफिस येथून महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणची वीजबिले भरली जातात; पण या महिन्यात हे अनुदान दिल्लीवरून येण्यास अडचणी येत आहेत.
तालुक्यातील २१ एक्स्चेंज साइटवर १५ कर्मचारी आहेत. त्यामुळे ६ एक्स्चेंज साईटवर ६ लोकांची गरज आहे. अपुºया कर्मचाºयांअभावी सध्या या ६ साइटवर कार्यरत असणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे. तसेच भिगवण, शेटफळ गढे, मानकरवाडी, येथेदेखील हीच समस्या आहे. वीजबिलाच्या दुप्पट खर्च डिझेलवर होत आहे. वीजपुरवठा बंद असल्याने ग्राहकांना सेवा व्यवस्थित मिळत नाही. तसेच ग्राहक वेळेत बिल भरत असूनदेखील सेवा मिळत नाही. बाजारात सध्या अनेक खासगी कंपन्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत तग धरण्यासाठी चांगली सेवा देणे गरजेचे आहे.

डिझेल उधार आणले आहे...
आम्हाला अनुदान येते, त्याप्रमाणे आम्ही थकीत बिले भरत आहोत. तसेच, सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत. दर महिन्याला या २१ एक्स्चेंज साइटसाठी ३८,००० हजार रुपये एवढे अनुदान येते. पण या महिन्यात फक्त १५,००० हजार रुपये आले आहेत. डिझेलचे २३००० हजार देणे बाकी आहे तसेच आता विनंती करून पंप मालकाकडून २०० लिटर डिझेल उधार आणले आहे, अशी माहिती बीएसएनएलचे उपमंडल अभियंता एस. ए. भगत यांनी ‘लोकमत’शीबोलताना सांगितले.

Web Title: BSNL's six centers are in lack of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.