बाजरीचे पीक फुलो-यात
By Admin | Updated: September 26, 2014 05:52 IST2014-09-26T05:52:01+5:302014-09-26T05:52:01+5:30
परिसरात बाजरीची पिके फुलोऱ्यात असून काही ठिकाणी कणसांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे.

बाजरीचे पीक फुलो-यात
पाटेठाण : परिसरात बाजरीची पिके फुलोऱ्यात असून काही ठिकाणी कणसांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. परिसरामध्ये यंदा उशिरा झालेल्या पावसाच्या परिणामुळे बाजरीच्या पेरण्या कमी झालेल्या दिसून येत आहे.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोरेगावभिवर, वाळकी, टेळेवाडी, वडगावबांडे, पानवली, टाकळीभिमा, देवकरवाडी, मेमाणवाडी या गावांच्या परिसरात देखील यंदा बाजरी पिकाच्या पेरण्या कमी हेक्टर क्षेत्रावर झाल्याचे चित्र आहे. बाजरी हे पीक तीन ते साडेतीन महिन्याच्या कालावधीत येणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहण्याच्या शेतकऱ्यांचा दृष्टीकोन असतो परंतु अनेक शेतकरी आडसाली ऊस पिकांमध्ये आंतरपिक म्हणून बाजरीची लागवड करतात. बाजरीच्या कणसात दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरीत यावर्षी उशिरा झालेल्या पावसामुळे बाजरीच्या उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकरी वर्ग करु लागला आहे.