अंदाजपत्रक एकमताने मंजूर

By admin | Published: May 21, 2017 04:06 AM2017-05-21T04:06:06+5:302017-05-21T04:06:06+5:30

महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने शनिवारी मंजुरी दिली. तीन दिवसांच्या चर्चेनंतर हे अंदाजपत्रक मंजूर झाले. स्थायी समितीचे

Budget approved unanimously | अंदाजपत्रक एकमताने मंजूर

अंदाजपत्रक एकमताने मंजूर

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने शनिवारी मंजुरी दिली. तीन दिवसांच्या चर्चेनंतर हे अंदाजपत्रक मंजूर झाले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कोणतीही योजना रखडणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही देत सर्वांनी मिळून एकत्र काम करू सहकार्य करावे, असे आवाहन केले.
मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय, पश्चिम भागात अत्याधुनिक रुग्णालय अशा बऱ्याच योजना अंदाजपत्रकात जाहीर केल्या आहेत. एकूण ६९ योजना जाहीर करण्यात आल्या असून करदात्या नागरिकांसाठी अपघात विमा योजना याचा त्यात समावेश आहे.
तीन दिवसांच्या चर्चेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी अंदाजपत्रकातील अनेक त्रुटी काढून त्यावर टिका केली. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनीही अंदाजपत्रकाच्या समर्थनार्थ विरोधकांनी सत्तेत असताना सादर केलेल्या अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींचा दाखला दिला व तुमच्यापेक्षा आम्ही बरेच चांगले केले असल्याचा दावा केला.
चर्चेला उत्तर देताना मोहोळ म्हणाले, ‘‘अनुभवी सदस्य आपल्या अनुभवातून बोलतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी राजकीय भाषण केले.
मला मात्र भाषण न करता
काम करून दाखवायचे आहे. कोणावरही आर्थिक अन्याय
होणार नाही, याची
काळजी प्रामाणिकपणे घेतली आहे. असे असताना काही जणांनी न्यायालयात दावा केला आहे. तो मागे घ्यावा, अशी विनंती आहे. नगरसचिव सुनील पारखी यांनी मंजुरीसाठी विचारणा केल्यानंतर सभागृहाने एकमताने अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.

सहा हजार कोटीचा पल्ला
सन २००२ मध्ये ६०० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक होते. ते आज सन २०१७-१८ मध्ये सहा हजार कोटी रूपयांचे झाले.
जायका सारख्या प्रकल्पात ९९० कोटी रूपयांचा करार झाला पण केंद्र सरकारने वर्षभरात आतापर्यंत फक्त २५ कोटी ९९ लाख रुपये दिले

Web Title: Budget approved unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.