अंदाजपत्रकात अठराशे कोटींची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:01 AM2017-11-30T04:01:48+5:302017-11-30T04:01:57+5:30

महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकात १ हजार ८३१ कोटी रूपयांची तूट येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विकास कामांना याचा फटका बसणार आहे.

 Budget estimates of Rs. 18 crores | अंदाजपत्रकात अठराशे कोटींची तूट

अंदाजपत्रकात अठराशे कोटींची तूट

Next

पुणे : महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकात १ हजार ८३१ कोटी रूपयांची तूट येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विकास कामांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे पुढीळ काळात उत्त्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबर अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागणार आहे.
स्थायी समितीने चालू वर्षाच्या २०१७-१८ या वर्षीच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेतला. पालिकेला मिळालेले उत्पन्न, अपेक्षित खर्च आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. आयुक्त कुणाल कुमार यांनी २०१७-१८ या आर्थिक वषार्साठी सुमारे ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. सुमारे ३९८ कोटींची वाढ करत ५ हजार ९९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा आढावा घेण्यात आला. अंदाजपत्रकात अपेक्षित मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, एलबीटी उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. ३० सप्टेंबर अखेर पर्यत मिळकतकरापोटी ७४८ कोटी, बांधकाम विभागास २०२ कोटी तर एलबीटी विभागास ८६९ कोटींचे उत्पन्न मिळालेले आहे. तर इतर अनुदान तसेच वेगवेगळया स्त्रोतादारे सप्टेंबर २०१७ अखेर पालिकेच्या तिजोरीत सुमारे २१३१ कोटींचा महसूल जमा झाला आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षात ४ हजार १६७ कोटी रूपयांचे उत्पन्न पालिकेला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेला तब्बल १हजार ८३१ कोटीची विक्रमी तुट येणार आहे.
पालिकेला सुमारे २६०० कोटी हे पगार तसेच देखभाल दुरूस्तीवर खर्च होणार आहेत. तर उर्वरीत १६०० कोटींमध्ये ४०० कोटींची कामे सुरू असून मार्च २०१८ अखेर पर्यंत अवघे १२०० कोटीच विकासकामांसाठी शिल्लक असणार आहे.

Web Title:  Budget estimates of Rs. 18 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.