बजेट हाऊसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:37+5:302021-07-17T04:09:37+5:30

कामाचे सखोल निरीक्षण एका इमारतींमधल्या १० फ्लॅट्सचे स्क्वे. फूट सेम असले तरी प्रत्येक घराची, त्यातील असणाऱ्या सदस्यांची, त्यांच्या ...

Budget housing | बजेट हाऊसिंग

बजेट हाऊसिंग

Next

कामाचे सखोल निरीक्षण

एका इमारतींमधल्या १० फ्लॅट्सचे स्क्वे. फूट सेम असले तरी प्रत्येक घराची, त्यातील असणाऱ्या सदस्यांची, त्यांच्या गरजेनुसार घरातील वस्तूंची मांडणी वेगळी असते, घरात किती लोक राहतात, लहान किती? मोठे किती? मराठी, पंजाबी, दाक्षिणात्य अशा कुटुंबांची गरज वेगळी असते. त्यामुळे अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

होम कन्सल्टन्सी

६० लाख रुपये किमतीच्या घराला कमीतकमी एखाद्या अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. माझं तर म्हणणं आहे की जेव्हा आपण घराच्या २ ते ३ वेगवेगळ्या घरांचा विचार करत असतो तेव्हाच आपण या कन्सल्टन्सी घेणे गरजेचं आहे. आपल्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात की नाही हे एक इंटेरिअर डिझायनर चांगल्या प्रकारे सांगू शकतो आणि मार्गदर्शनही करू शकतो.

जिथे रोज राहतो रोजचा लागणाऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी योग्य जागा असेल, आपल्या आवडीनुसार आणि लेटस्ट ट्रेंड्सनुसार उत्तम कलर कॉम्बिनशन्स असतील. झाडे, प्रकाशयोजना, डेकोरेटिव्ह आयटमने घर सजवलेलं असेल तर अशा घरात नेहमीच प्रसन्न वाटतं. स्वयंपाकघर खूप व्यवस्थित प्लॅन करण गरजेचं असतं. बायकांचा वेळ कमी जातो आणि काम पटापट होऊन स्त्रीचा वेळ वाचणे सहज शक्य आहे . एक छोटे उदाहरण म्हणजे आपण घरात साधारण ट्यूबलाईट वापरतो. एका रूममध्ये २ ट्यूबलाईट असतात. ट्यूबलाईटचा उजेड हा नीळ घातल्यासारखा प्रकाश देतो. हेच जर आपण सिलिंग सरफेस लाईट वापरले तर आपल्याला खोलीमध्ये सर्वत्र उत्तम दर्जाचा उजेड मिळतो. घरातील ड्राय बाल्कनीचा दरवाजा हा तेथील वॉशिंग मशीनची जागा ठरवून केल्यास आपल्याला शिल्लक जागा अधिक उत्तमपणे वापरता येते. अशा छोट्या टिप्समधून आपण घराचा परिपूर्ण आनंद घेऊ शकता.

"मानवी शरीरात काही अडचणी निर्माण झाल्यास आपण तज्ज्ञ डॉक्टर्सकडे जातो. त्याचप्रमाणे समस्या निर्माण होण्यापूर्वी आपण घरखरेदी प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच इंटिरियर डिझायनर का आवश्यक आहे याचे एक छोटेसे उदाहरण आम्ही आपल्याला देऊ इच्छितो.

तुमचं बजेट काही असो, पण पूर्ण घरातील अंतर्गत सजावटीचे नियोजन करून घेणं, आपल्या गरजेनुसार प्लॅन करून घेणं सुरुवातीला खूप गरजेचं आहे. मग तुम्ही बजेटनुसार एक एक रूम एक एक एरिया आपण अॅड करू शकता. पण त्या त्या गोष्टीसाठी विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे.

घरातील गोष्टींसाठी १० वेळा इंटेरिअरसारख्या गोष्टीवर खर्च होत नाही आणि त्याचप्रमाणे १० वेळा घर बदललेदेखील जात नाही. म्हणून सुरुवातीला नियोजन केलेल्या घरात जर राहिलो तर काय फरक पडतो, याचा अनुभव नक्कीच घेणं गरजेचं आहे. महाग आहे किंवा बजेटच्या बाहेर आहे असे समजून त्या वाटेला न जाण्यापेक्षा त्यांचे योग्य ते मानधन देऊन घर किती आकर्षक दिसू शकते, आपल्या पैशाचा व जागेचा योग्य वापर कसा होऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे.

- सायली बेलसरे

ऑलिव्ह इंटेरिअर्स

Web Title: Budget housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.