अंदाजपत्रकातील योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:51 AM2019-01-07T01:51:47+5:302019-01-07T01:52:12+5:30
दोन वर्षांत भाजपाकडून गाजरच : विकास योजनांचा निधी किरकोळ कामांसाठी पळविला
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : महापालिकेत पहिल्यांदाच बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाने आपल्या दोन वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये शहराच्या विकासासाठी व पुणेकरांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित केल्या. परंतु गेल्या दोन वर्षांत यापैकी अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या असून, सायकल ट्रॅक, नदीसुधार प्रकल्प, बीआरटी मार्ग, सिंहगड उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीकाठ विकसनसारख्या मोठ्या योजनांचा निधी सत्ताधाऱ्यांनी प्रभागातील किरकोळ कामांसाठी वर्गीकरण करून पळविला आहे. यामुळे सत्ताधाºयांकडून गेल्या दोन वर्षांत पुणेकरांना विविध योजनांचे केवळ ‘गाजर’च दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहराचा सर्वांगीण विकास डोळ््यासमोर ठेवून प्रशासन आणि सत्ताधारी दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये विविध योजना प्रस्तावित करतात. महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाने आपले पहिले अंदाजपत्रक सादर करताना आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावाने पुणेकरांसाठी अनेक योजना प्रस्तावित केल्या. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, शिवसृष्टी, कुंडलिका-वरसगाव योजना, ई-लर्निंग स्कूल, भामा-आसखेड प्रकल्प, योगा केंद्र, मराठी माध्यम मॉडेल स्कूल, समुद्री जैवविविधता केंद्र उभारणे, पांजरपोळ सुरू करणे, ज्येष्ठ नागरिक भवन आदी अनेक योजना प्रस्तावित केल्या. परंतु दोन वर्षे झाली तरी अद्यापही अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. दुसरे अंदाजपत्रक सादर करताना थोडे वास्तवाचे भान ठेवून काही प्रमाणात योजना कमी केल्या खºया, पण प्रस्तावित योजना अस्तित्वात येण्यासाठी प्रशासन व सत्ताधाºयांनी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत.
मोठ्या योजनांचा निधी प्रभागातील किरकोळ कामांसाठी पळविला
1 अंदाजपत्रकात पूर्व नियोजन करून सायकल ट्रॅक, नदीसुधार प्रकल्प, मुळा-मुठा नदीकाठ विकसन व संवर्धन, बीआरटी मार्ग, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल यासाठी प्रस्तावित केलेला निधी नगरसेवकांनी प्रभागातील सिमेंट रस्ते, विद्युत खांबांची उभारणी, विरंगुळा केंद्र, समाजमंदिर, ड्रेनेजलाईन अशा विविध किरकोळ कामांसाठी पळविण्यात आला आहे.
2यामध्ये प्रशासनदेखील मागे नसून, नदीसुधार योजनेअंतर्गत
६४ कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाची थकबाकी देण्यासाठी वापरण्यात आला.
3घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी मुळा-मुठा नदीकाठ विकसन आणि संवर्धन योजनेतील १० कोटी
रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
कोटी शिवसृष्टी, सायकलींचे शहर ओळख परत मिळविण्यासाठी आवश्यक पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५५ कोटी, नदीसुधार प्रकल्प, मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, सिंहगड रस्ता उड्डाणपूल, तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा, मुलींसाठी अभ्यासिका, मोफत सॅनिटरी नॅपकीन, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, नद्यांवरील पुलांचे सुशोभीकरण अशा अनेक चांगल्या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली. परंतु अंदाजपत्रकातील या बहुतांश योजनादेखील कागदावरच राहिल्या आहेत.
प्रशासनाची उदासीनता कारणीभूत
लोकप्रतिनिधी या नात्याने शहराचा, लोकांचा विचार करून आम्ही अनेक चांगल्या योजना दोन वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु योजनांसाठी सल्लागार नियुक्त करणे, आराखडे तयार करणे, प्रस्तावांना मान्यता घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु अनेक चांगल्या योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनदेखील केवळ प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव व उदासीनतेमुळे योजना कागदावर राहिल्या आहेत. परंतु पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनासारखी महत्त्वाची योजना प्रत्यक्ष सुरू झाली असून, काही पुणेकरांना लाभदेखील मिळाला आहे. परंतु अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केलेल्या सर्व योजना प्रत्यक्ष सुरू करण्यात येतील. - मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती
सत्ताधाऱ्यांचे पहिले अंदाजपत्रक (सन २०१७-१८) कागदावरच
४अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (सल्लागर नियुक्त)
४ससूनच्या धर्तीवर नवीन हॉस्पिटलची उभारणी
४सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज
४शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी
नवीन पर्याय-कुंडलिका-वरसगाव योजना (रद्द)
४योग केंद्र
४आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
उभारणे.
४मराठी माध्यमांचे मॉडेल स्कूल
४पांजरपोळ सुरू करणे
४ज्येष्ठ नागरिक भवन उभारणे
४भामा-आसखेड प्रकल्प पूर्ण करणे