बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या सहा गाड्यांचा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 06:06 PM2020-02-15T18:06:50+5:302020-02-15T18:12:27+5:30
या गाडीला मिळाली सर्वाधिक नऊ लाख ३० हजार किंमत
पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी हे ठेवीदार फसवणूकप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे न्यायालयाने ठेवीदारांची आणि बँकांची देणे परत करता यावी म्हणून डीएसकेंच्या ९ पैकी सहा वाहनांचा शनिवारी लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक किंमत इनोव्हा या गाडीला मिळाली. त्या वाहनाचा नऊ लाख ३० हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. तर सर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनास मिळाली. तिची तीन लाख पाच हजार रुपयांना विक्री झाली.
पुण्यात डीसकेंच्या गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. मावळप्रांत संदेश शिर्के यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते.
लिलाव सुरू झाल्यानंतर काहीवेळातच पाच वाहनांचा लिलाव संपला. लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत नऊपैकी पाच वाहनांची विक्री झाली. त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला.२६ लाख ६४ हजार रुपये किंमत असलेली आॅगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवली होती. परंतु, या दुचाकीवर कुणाकडूनही बोली लावली गेली नाही.
..........
वाहन अपेक्षित किंमत मिळालेली रक्कम खरेदीदार
ऑगस्टा एफ-4 26,64,559 लिलाव नाही --
ह्युंदाई सॅन्ट्रो 1,20,000 लिलाव नाही --
टोयोटा क्वालिस 2,50,000 3,05,000 शुफियान शेख
टोयोटा इटिओस 4,30,000 लिलाव नाही --
टोयोटा इनोव्हा 8,47,000 8,50,000 बालाजी मोटर्स
टोयोटा इनोव्हा 4,50,000 6,05,000 विनोद डोंगरे
टोयोटा इनोव्हा 8,50,000 9,30,000 संपत पाटील
टोयोटा इनोव्हा 6,18,000 7,75,000 बालाजी मोटर्स
टोयोटा इनोव्हा 3,00,000 4,80,000 शुफियान शेख
एकूण 76,09,569 39,45,000