बारामतीमधील बांधकाम व्यावसाईक ठेवणार एक दिवस कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 09:52 PM2021-02-10T21:52:37+5:302021-02-10T21:52:41+5:30

बांधकाम व्यवसायामधे काम करण्यासाठी लागणारे बांधकामसाहित्य हा मुख्य घटक असतो . तो साधारणपणे बांधकाम खर्चाच्या ७० टक्के पर्यंत असतो.

Builders in Baramati will be on strike for one day | बारामतीमधील बांधकाम व्यावसाईक ठेवणार एक दिवस कामबंद

बारामतीमधील बांधकाम व्यावसाईक ठेवणार एक दिवस कामबंद

Next

बारामती : वाढत्या महागाईचा फटका बसुन बांधकाम व्यवसायाचे गणित बिघडत असल्याचा निषेध करण्यासाठी करत बारामतीतल्या बांधकाम व्यावसायीक एक दिवस काम बंद ठेवणार आहेत. 

बांधकाम व्यवसायामधे काम करण्यासाठी लागणारे बांधकामसाहित्य हा मुख्य घटक असतो .तो साधारणपणे बांधकाम खर्चाच्या ७० टक्के पर्यंत असतो .हे दर स्थिर असतील तर केलेल्या व्यवसायामध्ये काही नफा होत असतो.मात्र, आता वाढत्या महागाईमुळे हे गणित चुकत आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी एक दिवस काम बंद ठेवण्याचे जाहिर केले आहे.


याबाबत बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडीयाचे बारामतीचे चेअरमन  दिपक काटे यांनी माहिती दिली. बांधकाम साहित्य मध्ये मुख्य भाग हा सिमेंट व स्टील चा असतो. या उत्पादन करणाºया कंपन्या वेळोवेळी साखळी पद्धतीने अनैसर्गिक दरवाढ करतात .यामुळे शासकीय कंत्राटदार यांचे निविदा पद्धतीने घेतलेल्या कामामध्ये तसेच इमारत बांधकाम व्यवसाईक यांचे उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सतत च्या दर वाढीमुळे सरकारला अपेक्षित परवडणारी घरे या योजना सुद्धा अडचणीत आल्या आहेत. सरकार ने बांधकाम व्यवसायाला शिस्त निर्माण होणे करिता जसे रेरा सारखा कायदा लागू केला. तसेच सर्व बांधकाम साहित्य उत्पादक यांचे दर स्थिर रहावे ,करिता केंद्रीय पातळीवर नियामक नेमावा ,अशी मागणी बिल्डर्स असो आॅफ इंडिया च्या वतीने करण्यात आली होती. परंतु या मध्ये निर्णय होत नसल्याने शुक्रवारी( दि. १२)    राष्ट्रीय व सर्व राज्य पातळीवर एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचे आयोजन बिल्डर्स असो आॅफ इंडिया तर्फे करण्यात आले आहे.

यामध्ये बिल्डर्स असो.बारामती सभासद सहभागी होणार असून या काम बंद आंदोलनास अध्यक्ष, क्रेडाई, बारामती यांनी त्यांचे संस्थेचे व इतर ही बांधकाम व्यवसाईक या आंदोलनास समर्थन देऊन सहभागी होणार आहेत.


आज बांधकाम उदयोग हा सर्वात मोठा उदयोग आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा, सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा हातभार लावणारा आहे.उदयोग दर्जा प्राप्त नसताना मोठ्या व्याजाची कर्जे घेऊन चालू असतो .अशा व्यवसायास मध्ये काम करणाऱ्या उद्योजकास स्थिरता निर्माण होनेकारिता सरकार ने मागणी मान्य करावी अशी अपेक्षा असोसिएशनचे चेअरमन काटे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Builders in Baramati will be on strike for one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.