Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:51 AM2024-05-29T11:51:42+5:302024-05-29T11:52:12+5:30

पुण्यातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागल्याने अजून किती मासे गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Builders Ministers MLAs, MPs leave no one behind Chief Minister eknath shinde instructions to Police Commissioner | Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

Pune Porsche Car Accident:बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कोणालाही सोडू नका; मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. एका आमदाराने फोन करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच नाव अजूनही समोर आले नाही. तर ससूनमधील डॉक्टरही या प्रकरणात फेरफार करण्यासाठी पैसे घेतल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल यांच्या निकटवर्तीयांची चांगलीच दाणदाण उडालीये. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती 

बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशा सूचनाही आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी  दिल्या आहेत. मुख्यमंत्री लवकरच पुण्यात अपघात झालेल्या घटनास्थळी पाहणी करणार असल्ल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच या प्रकरणाबाबत पोलीस आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात आले आहेत. कल्याणी नगर अपघातात दररोज मोठमोठे खुलासे होत असताना, सीसीटीव्ही फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांना चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बाळाच्या चुकीमुळे तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागत असल्याचे बोलले जात आहे. ससूनच्या प्रकरणानंतर बाप - लेकाच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 
 

Web Title: Builders Ministers MLAs, MPs leave no one behind Chief Minister eknath shinde instructions to Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.