आग लागलेली इमारत होती कायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:09+5:302021-01-23T04:12:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या बिल्डिंगला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून आवश्यक ते सर्व परवाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या बिल्डिंगला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून आवश्यक ते सर्व परवाने देण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
फायर एनओसी, बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट पण देण्यात आले आहे. इमारतीमध्ये पोटमाळे काढण्यास कायद्याने परवानगी असून ही परवानगी देखील देण्यात आली होती, अशी माहिती ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, ‘फायर एनओसी’ कोणी दिली, ‘फायर ऑडिट’ होते का, पंतप्रधान भेटीच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली होती या प्रश्नांचा यात समावेश होता. पुणे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी सांगितले की, सिरम इन्स्टिट्यूटला सन २०१८ मध्येच बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला देण्यात आला. ‘एमआयडीसी’च्या मुंबई कार्यालयाने ‘फायर एनओसी’ दिली. यामुळेच विविध परवानग्यांच्या पातळीवर गडबड झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत नाही.