बुलेट ट्रेन प्रकल्पाने खोरचे शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:18+5:302021-08-18T04:14:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोर : केंद्र शासनाच्या अतिमहत्त्वाकांक्षी मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामाने आता वेग धरला असून पुणे जिल्ह्यातील ...

The bullet train project frightened the farmers of Khor | बुलेट ट्रेन प्रकल्पाने खोरचे शेतकरी धास्तावले

बुलेट ट्रेन प्रकल्पाने खोरचे शेतकरी धास्तावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खोर : केंद्र शासनाच्या अतिमहत्त्वाकांक्षी मुंबई-हैदराबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामाने आता वेग धरला असून पुणे जिल्ह्यातील गावागावात याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यातील ७०० किमी अंतरातील हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यातील ४५ गावांना या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फटका बसून या गावातील भूसंपादन करण्यात येणार तयारी होण्यास सुरुवात झाली आहे. यात दाैंड तालुक्यातील खोरसह अनेक गावांचा समावेश असल्याने आपले किती क्षेत्र या प्रकल्पात जाणार या भितीने येथील शेतकरी धास्तावले आहेत.

मध्य रेल्वे प्रकल्पाच्या नियोजित मार्गाशेजाराच्या २ हजार फूट रुंदीच्या परिसरातील जमीनधारकांना बोलावून त्याची माहिती देण्यात लवकरच सुरुवात होणार असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. दौंड तालुक्यातील खोर व पडवी गावाचा या प्रकल्प योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास केंद्र शासनाच्या आराखड्यानुसार आतापर्यंत खोरमधील पाच तर पडवीमधील नऊ शेतकरी वर्गाच्या गट नंबरचे नावे यादीत नमूद करण्यात आली आहे. अजूनही पुढील काही कालावधीत आणखी किती शेतकरी वर्गाचे सातबारे यामध्ये अडकणार आहेत याची अजूनही शास्वती नाही. मात्र हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने हा प्रकल्प कोणीही रोखू शकणार नाही हे ही तितकेच सत्य आहे. त्यामुळे आता जमीनबाधित शेतकरी वर्ग चिंतेच्या भोवऱ्यात सापडला गेला आहे. या होऊ खातलेल्या प्रकल्प योजनेत किती क्षेत्र हे दौंड तालुक्यातील भूसंपादन होणार आहे याचा पक्का आराखडा तयार झाला नसून त्यांच्या आताच्या सध्याच्या आराखड्यात सध्या तरी खोरमधील पाच शेतकरी वर्गाच्या शेतजमिनी आहेत. या बाधित शेतकरी वर्गाला याचा काय मोबदला मिळणार व त्यांच्या दरडोई आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेल्या शेतजमिनीच्या बदल्यास नेमके केंद्र शासनाचे धोरण काय असणार हे पाहणे सध्याच्या स्थितीत महत्त्वपूर्ण असणारा आहे.

फोटो : बुलेट ट्रेन

Web Title: The bullet train project frightened the farmers of Khor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.