आपल्या देशावर घुसखोरांचा भार -अक्षय जोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:34 AM2018-08-13T02:34:38+5:302018-08-13T02:35:15+5:30
आपल्या देशावर घुसखोरांचा भार आहे. त्यात रोहिनग्यांचा भार पेलवणारा नाही. ते काही आश्रित म्हणून आलेले नाहीत. ४० हजार रोहिनगे भारतात वास्तव्यास आहेत.
पुणे : आपल्या देशावर घुसखोरांचा भार आहे. त्यात रोहिनग्यांचा भार पेलवणारा नाही. ते काही आश्रित म्हणून आलेले नाहीत. ४० हजार रोहिनगे भारतात वास्तव्यास आहेत. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्व्हेन्शन कायद्यावर स्वाक्षरी केलेली नसल्यामुळे हा कायदा भारताला लागू नाही. रोहिनग्यांचा म्यानमारमध्ये अन्नधान्य, वस्त्र, निवारा, आरोग्य अशी सर्व व्यवस्था भारत सरकार मानवता प्रकल्पांतर्गत करणार आहे, असे
मत ब्लॉगलेखक अक्षय जोग यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासनातर्फे अक्षय जोग यांच्या ‘व्हाय रोहिनग्या शुड बी डिपोर्टेड’
या पुस्तिकेचे प्रकाशन अध्यासनाचे अध्यक्ष आणि नॅशनल शिपिंग बोडार्चे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जोग बोलत होते. जोग म्हणाले की, रोहिनग्यांचा प्रश्न चीनला भेडसावत असल्याने या विषयावर भारत आणि चीन यांच्यात मतैक्य आहे. घुसखोर आणि शरणार्थी म्हणून प्रश्न वेगळे आहेत. त्याची चर्चा केली आहे. मुस्लिमबहूल पाकिस्तानातील बौद्ध आणि बौद्धबहूल म्यानमारमधील बौद्ध रोहिनगे म्हणून भारतात आले आहेत. हिंदूबहूल सुरक्षित भारतामध्ये सर्वधर्म शांततेत नांदत आहेत. हा सद्गुण विकृती ठरू नये.
रावत म्हणाले की, देशामध्ये दीर्घकाळ विपर्यस्त आणि काहीवेळा खोटा इतिहास सांगितला गेला. त्याला अभ्यास करून झालेल्या लेखनातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे. ईस्लाम हा केवळ धर्म नाही, तर हिंसेवर विश्वास असलेली कट्टर जहालमतवादी राजकीय विचारप्रणाली आहे.
मुस्लिम बहुसंख्य झाले की, ते त्या राष्ट्राची डोकेदुखी होतात. १९४७ मध्ये स्वतंत्र झालेला भारत अखंड राखणे हे आपले कर्तव्य आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू आणि बौद्ध कुठे आहेत हे विचारले पाहिजे. ४० हजार रोहिनग्यांविषयी तथाकथित पुरोगाम्यांना पान्हा फुटला आहे.