बोगस कॉलसेेंटर्सवर शहरात छापासत्र

By admin | Published: November 18, 2016 06:21 AM2016-11-18T06:21:47+5:302016-11-18T06:21:47+5:30

गुन्हे शाखेच्या सायबर सेलने शहराच्या विविध भागांमध्ये आलेल्या तब्बल दहा बोगस कॉलसेंटर्सवर बुधवारी मध्यरात्री छापे टाकले

Burglars call centers on the city | बोगस कॉलसेेंटर्सवर शहरात छापासत्र

बोगस कॉलसेेंटर्सवर शहरात छापासत्र

Next

पुणे : गुन्हे शाखेच्या सायबर सेलने शहराच्या विविध भागांमध्ये आलेल्या तब्बल दहा बोगस कॉलसेंटर्सवर बुधवारी मध्यरात्री छापे टाकले. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु, संबंधितांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यात एका बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला होता. अमेरिकन तसेच इंग्लड नागरिकांची क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्यांना लुटत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली होती. शहरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बोगस कॉलसेंटर्स सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कॉलसेंटर्सची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
सायबर सेलच्या विविध पथकांनी एकाच वेळी स्वारगेट, मगरपट्टा, कल्याणीनगर, विमाननगर यांसह इतर ठिकाणच्या दहा कॉल सेंटरवर छापे टाकले. तेथून संगणक साहित्य, हार्ड डिस्क, सीपीयू ताब्यात घेण्यात आले आहेत.
या ठिकाणी काम करणारे तसेच कॉलसेंटरच्या चालकांकडे रात्री उशिरापर्यंत व गुरुवारी दिवसभर चौकशी केली. दहा ठिकाणी जवळपास पाचशे लोक काम करीत असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Burglars call centers on the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.